अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवारांच्या विमानातील दोन्ही रेकॉर्डर जळून खाक झाले आहेत. एएआईबीकडून बारामतीमधील विमान अपघाताचा तपास सुरू आहे. अजित पवार यांच्या विमानात २ स्वतंत्र रेकॉर्डर होते. विमान अपघातामध्ये दोन्ही रेकॉर्डर जळून खाक झाल्याची माहिती एएआईबीने दिली. डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. डेटा रेकॉर्डरमधून माहिती डिकोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, या विमान अपघात प्रकरणी विमानाच्या एअरवर्थिनेस म्हणजेच हवाई प्रवासक्षमता आणि विमानाची उड्डाण योग्यतेबाबत तपास होणार आहे. DGCA कडून विमानाच्या एअरवर्थिनेस आणि ऑपरेशनल कंडीशन याबाबत समांतर चौकशी केली जात आहे. तपासाअंती ते विमान उडण्यासाठी सुरक्षित होतं का? याबाबत स्पष्टता येईल. या तपासणीला पुढील १० ते १५ दिवस लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.