Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या क्रॅश झालेल्या विमानाचा रिपोर्ट सामच्या हाती

Ajit Pawar plane crash report: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं आहे. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान झालेल्या या अपघातात अजित पवारांसह काही सहकारी मृत्युमुखी पडले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या भीषण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. या दुर्दैवी घटनेचा प्राथमिक रिपोर्ट 'साम टीव्ही'च्या हाती लागला आहे. त्यामध्ये अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

या रिपोर्टनुसार, विमानात एकूण ५ व्यक्ती होत्या. त्यामध्ये पहिले नाव अजित पवार यांचे आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमान लँडिंगच्या वेळी विसीबिलिटी (दृश्यमानता) अत्यंत कमी होती. अशा प्रतिकूल हवामानात लँडिंगचा प्रयत्न केला गेल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या तांत्रिक अहवालामुळे अपघाताच्या वेळी नेमकी काय स्थिती होती, यावर आता अधिक प्रकाश पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com