Sunny Leone : सनी लिओनी ठरली सरकारच्या 'या' योजनेची लाभार्थी; दरमहा मिळतात १ हजार रुपये | VIDEO

Mahatari Vandan Yojana : छत्तीसगढ सरकारच्या महतरी वंदन योजनेची अभिनेत्री सनी लिओनी ही लाभार्थी ठरली आहे. यात तिला सरकारकडून दरमहा १ हजार रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री सनी लिओनीला सरकारकडून दरमहा १ हजार रुपये मिळतात. छत्तीसगढ सरकारच्या योजनेची सनी लिओनी हि लाभार्थी ठरली आहे. छत्तीसगड सरकारच्या ‘महतरी वंदन योजनेची’ लाभार्थी म्हणून सनी लिओनीच्या नावावर पैसे पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

विवाहित महिलांना महतरी वंदन या छत्तीसगड सरकारच्या योजनेअंतर्गत दर महिन्याला दिले जाणारे १ हजार रुपये पाठवले जातात. कथितरित्या छत्तिसगड येथे सनी लिओनीच्या नावाने एक ऑनलाईन खाते उघडण्यात आलंय. या महतरी योजनेच्या वेबसाईटवर तपासणी केली असता संबंधीत फाइलमध्ये लाभार्थी व्यक्तीचे नाव सनी लिओन आणि पतीचे नाव जॉनी सिन्स दाखवण्यात आले आहे. तसंच मार्च आणि डिसेंबरचा हप्ता देखील लाभार्थीला मिळाला असल्याचं दिसत आहे. आता बस्तर जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com