Marathwada News| गर्भपाताचं रॅकेट मराठवाडाभर!
Marathwada News | अवैध गर्भलंग निदान आणि गर्भपात रॅकेटचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, भोकरदन आणि आता थेट पुन्हा एकदा बीड पर्यंत पोहोचले आहेत. जानेवारी महिन्यात गेवराई मधून पोलिसांच्या छाप्यात धक्का देऊन पसार झालेला डॉ.सतीश गवारे हा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सर्व गर्भपाताचे डॉक्टर व एजेंटच्या संपर्कात असल्याची माहिती आता पोलीस तपासात समोर आलीय. संपूर्ण मराठवाडाभर त्याचे गर्भलिंगनिदानाचे जाळे असल्याची माहिती समोर आली असून आवश्यकतेनुसार तो गर्भलिंग निदानासाठी जात होता. इतकच नव्हे तर दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन गर्भलिंग निदानासाठी तो 55 हजार रुपये तर स्थानिक पातळीवर 30 ते 40 हजार रुपये दर आकारात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.