VIDEO: पेपरफुटीचा नरेटिव्ह सेट केला जात आहे, Devendra Fadnavis यांचा मोठा आरोप

Monsoon Assembly Session 2024 News : पेपरफुटी संदर्भात या अधिवेशनात कायदा आणण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

पेपरफुटीचा मुद्दा विधानसभेत पेटला आहे. पेपरफुटीबाबत सरकार कायदा करणार आहे का? असा प्रश्न रोहित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. पेपरफुटीप्रकरणी याच अधिवेशनात कायदा बनवावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तलाठी परीक्षेत उत्तर चुकले होते, तिथे घोटाळा झाला नाही असं फडणवीस म्हणाले. आम्ही १ लाख लोकांना पारदर्शी रोजगार दिला, पेपरफुटीचा नरेटिव्ह सेट केला जात असल्याचं फडणवीस म्हणाले. आम्ही एक लाख लोकांना रोजगार दिला हा रेकॉर्ड आहे. पेपरफुटीबाबत‌ कायदा करण्यासाठी आमचा मनोदय आहे. याच अधिवेशनात हा कायदा आणला ‌जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com