Thane : ठाण्यातील ८४ हॉटेल्सना ठाणे मनपाची नोटीस, कारण तंदूर रोटी, पाहा व्हिडीओ

Thane Municipal Corporation News : कोळशावर तंदूर रोटी करणाऱ्या ८४ हॉटेल्स मालकांना ठाणे मनपाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. इलेक्ट्रिक भट्टी वापरण्याचे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.

Thane Municipal Corporation News : मुंबईनंतर आता ठाण्यातही कोळश्यावरील तंदूर रोटी बंद होण्याच्या मार्गावर आहे. बीएमसीनंतर ठाणे मनपाकडून कोळश्यावरील तंदूर बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ठाणे मनपाकडून हॉटेल व्यवसायिकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

कोळसा जाळण्यामुळे होणारे वायू प्रदूषण आणि पर्यावरणीय हानी लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. मनपाने हॉटेल व्यवसायिकांना कोळशाऐवजी इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोळश्यावर तंदूर रोटी तयार करण्यास बंदी घालण्यात येणार असून, यामुळे हॉटेल व्यवसायिकांना पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारावे लागणार आहेत.

ठाण्यातील तब्बल ८४ हॉटेल्सला ठाणे महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. कोळश्यावर तंदूर रोटी तयार करणाऱ्या हॉटेलला ठाणे मनपाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. ठाणे मनपाकडून हॉटेल चालकांना इलेक्ट्रिक भट्टी वापरण्याचे आवाहन करण्यात आलेय. तंदूर रोटी कोळश्यावर तयार करण्यास बंद करा, अशी नोटीस पाठवण्यात आली आहे.

कोळशावर तंदूर रोटी करणाऱ्या ८४ हॉटेल्स मालकांना ठाणे मनपाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. इलेक्ट्रिक भट्टी वापरण्याचे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे. मनपाच्या नोटीसनंतर आता हॉटेल्स व्यवसायिक काय भूमिका घेतात? त्याकडे लक्ष लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com