बाबो, अधिकारी महिलेकडं घबाडच सापडलं! मुंबई एअरपोर्टवर 25 किलो सोनं जप्त | Mumbai Airport

मुंबई विमानतळावर २५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. महिला दूतावासात उच्चपदावर काम करत असल्याने तिला अटक केली नाही.

मुंबई विमानतळावर डीआरआयनं मोठी कारवाई केली आहे. तब्बल २५ किलो सोनं जप्त केलं आहे. अफगाणिस्तानच्या कौन्सुल जनरलकडून हे सोनं जप्त केलंय. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) केलेल्या या कारवाईत जप्त केलेल्या सोन्याची अंदाजे किंमत १८.६ कोटी रुपये आहे. दूतावासात काम करत असल्याने महिलेला डिप्लोमॅटिक इम्युनिटी deplomatic immunity असल्याने तिची अटक टळली. ही अधिकारी महिला दुबईवरून भारतात आली होती. ग्रीन चॅनलने प्रवेश करत आपल्याकडे सोने नसल्याचा दावा या अधिकारी महिलेने केला होता. तपासणीत जॅकेट, नी कॅप, लेगिंग आणि पट्टयात सोन्याच्या विटा लपवल्याचे आढळून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com