मुंबई : वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा असते. ज्याचा आपल्या जीवनावर चांगल्या व वाईट प्रकारे प्रभाव पडतो.
हे देखील पहा -
वास्तूशास्त्रानुसार आपण आपल्या घरातील प्रत्येक वस्तूची जागा किंवा दिशा नेहमी ठरवत असतो. आपल्या घरात कोणत्या वस्तू असायला हवा व कोणत्या वस्तूमुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते यासाठी आपण वास्तूशास्त्राचा आधार घेत असतो. नवीन घर घेताना किंवा त्याची पुर्नबांधणी करताना त्याची रचना कशाप्रकारे करायला हवी हे जाणून घेऊया.
१. वास्तूशास्त्रानुसार आपल्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला असेल तर शुभ मानले जाते. व्यावहारिक दृष्टीने ही दिशा अधिक महत्त्वाची मानली जाते. जर उत्तर दिशेला आपल्या घराचा दरवाजा असेल तर तो देखील शुभ मानला जातो. या दिशेला दरवाजा असल्यास आपल्याला सतत लांबचा प्रवास घडू शकतो व यामुळे आर्थिक उन्नती होऊ शकते.
२. घरातील मुख्य माणसाची झोपण्याची दिशा किंवा आपला बेडरुम हा दक्षिण नैर्ऋत्य भागात असायला हवी. यामुळे आर्थिकतेमध्ये घट होत नाही.
३. घराच्या वायव्य भागात पाहुण्याची खोली (Room) किंवा अडगळची खोली आपण बनवायला हवी.
४. ईशान्य भागाकडे घरातील देवघर असावे. या भागात अभ्यास, वाचन, मनन, चिंतन, प्राणायाम, ध्यानधारणा आपण करु शकतो.
५. घरातील दरवाजा हा नेहमी आतल्या बाजूने उघडला जाईल याची काळजी घ्या. बाहेरुन उघडला जाणारा दरवाजा हा नेहमी शुभ मानला जातो.
६. घराचा (Home) मुख्य दरवाजा बनवताना दरवाजाच्या खालच्या भागामध्ये व जमिनीचा थोडासा फरक असायला हवा. ज्यामुळे दरवाजा उघडताना घासणार नाही. घासून दार उघडून पैसे मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
Edited By - Komal Damudre
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.