Namdar Chashak: नामदार चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेच्या फायनलला दिग्गज क्रिकेटपटू लावणार हजेरी

Namdar Chashak 2024: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून, परळीत नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील फायनलचा सामना येत्या ३ मार्च रोजी होणार आहे.
Yuvraj singh and zaheer khan will attend the final of namdar chashak in parali news in marathi
Yuvraj singh and zaheer khan will attend the final of namdar chashak in parali news in marathi yandex
Published On

Yuvraj Singh Zaheer Singh Will Come To Parali:

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून, परळीत नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील फायनलचा सामना येत्या ३ मार्च रोजी होणार आहे. हा फायनलचा सामना पाहण्यासाठी आणि बक्षिस वितरण्याच्या कार्यक्रमासाठी दिग्गज क्रिकेटपटू हजेरी लावणार आहेत.

या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघातील माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि वेगवान गोलंदाज जहीर खान परळी वैद्यनाथ येथे उपस्थित राहणार आहेत. गेल्या एक महिन्यापासून परळी शहरात नाथ प्रतिष्ठान आयोजित डे-नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू आहे.

Yuvraj singh and zaheer khan will attend the final of namdar chashak in parali news in marathi
IND vs ENG 5th Test: धरमशालेत रंगणार भारत- इंग्लंड अंतिम कसोटी सामना! इथे कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड?

या क्रिकेट स्पर्धेमध्ये परळी शहरासह परळी विधानसभा मतदारसंघातून २६० पेक्षा अधिक संघांनी भाग घेतला होता. त्याचबरोबर डीएम ११ या क्रिकेट संघाच्या माध्यमातून स्वतः धनंजय मुंडे यांनी देखील याच क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होऊन क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला होता. (Cricket news marathi)

Yuvraj singh and zaheer khan will attend the final of namdar chashak in parali news in marathi
IND vs ENG: धरमशाला कसोटीत जॉनी बेअरस्टोला इतिहास रचण्याची संधी! दिग्गज खेळाडूंच्या यादीत करणार प्रवेश

दरम्यान ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून या स्पर्धेचा फायनल सामना येत्या ३ मार्च रोजी वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यानंतर याच ठिकाणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या फायनल सामन्यासह बक्षीस वितरणाच्या समारंभास भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज म्हणून ओळख असलेला युवराज सिंग तसेच बॉलिंगची स्पीड मशीन म्हणून प्रसिद्ध असलेला जहीर खान हे दोन खेळाडू यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com