Yuvraj Singh : माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या आईच्या घरात चोरी; सोन्याचे दागिने आणि रोख पैसे चोरट्यांकडून लंपास

Yuvraj Singh Latest News in Marathi : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या आईच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. युवराज सिंगची आई शबनम सिंग यांनी चोरी झाल्याचे कळताच पोलिसांत तक्रार दिली.
Yuvraj Singh
Yuvraj SinghSaam Tv
Published On

Yuvraj Singh Latest News :

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या आईच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. युवराज सिंगची आई शबनम सिंग यांनी चोरी झाल्याचे कळताच पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. (Latest Marathi News)

'न्यूज १८'च्या मीडिया रिपोर्टनुसार, हरियाणाच्या पंचकुला या भागात युवराज सिंगची आई शबनम सिंग यांचं घर आहे. चोरीचं प्रकरण सहा महिने जुनं आहे. मात्र, शबनम सिंग यांनी सहा महिन्यांनी पोलिसांत तक्रार दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yuvraj Singh
R Ashwin Record: राजकोटमध्ये इतिहास घडला! आर अश्विनने 500 विकेट्स घेत मोडले हे मोठे रेकॉर्ड्स

माजी क्रिकेटर युवराज सिंहची आई शबनम सिंग यांनी एमडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ही चोरीची घटना घडली. त्यांनी त्यांच्या घरात दोन नोकर कामाला ठेवले होते. त्यांनीच ही चोरी केल्याचे उघड झाले आहे.

शबनम यांनी पोलिसांना सांगितले की, घरातील सोन्याचे दागिने आणि ७५००० रुपयांची चोरी झाली. ललिता दास आणि शीलेंद्र दास असे या दोन्ही नोकरांचं नाव आहे. शबनम यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंद केली आहे. एमडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही चोरीची घटना घडली आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. एकूण या दोघांनी १ लाख ७५ हजार किंमतीची चोरी केली आहे.

Yuvraj Singh
IND vs ENG 3rd Test: ना नो, ना वाईड; तरीही एकही चेंडू न टाकता इंग्लंडला मिळाल्या ५ धावा, वाचा कसं?

६ महिने जुनं प्रकरण

तक्रारीत शबनम यांनी सांगितलं की, त्यांचं गुडगावमध्ये घर आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या तिथेच राहत होत्या. गुडगावमधून पाच ऑक्टोबर २०२३ ला त्या पुन्हा घरी आल्या. त्यावेळी चोरी झाल्याचे कळाले. त्यांनी घरातील नोकरांची विचारपूस केली. तेव्हा दोन आरोपी नोकर घर पळून गेल्याचे कळाले. त्यानंतर त्यांच्यावर चोरीचा संशय आहे. दोन्ही नोकर दिवाळीतच घर सोडून गेल्याची माहिती मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com