Yusuf Pathan: 6,6,6,6,6,6,6,6,6...युसुफ पठाणचा कहर! शेवटच्या 12 चेंडूत चोपल्या 52 धावा

Yusuf Pathan Sixes: लेजेंड्स लीगच्या फायनलमध्ये युसुफ पठाणचा कहर पाहायला मिळाला आहे.
Yusuf Pathan: 6,6,6,6,6,6,6,6...युसुफ पठाणचा कहर! शेवटच्या 12 चेंडूत चोपल्या 52 धावा
yusuf pathan twitter
Published On

भारताचा माजी फलंदाज युसुफ पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करुन बरीच वर्ष झाली आहेत. मात्र अजूनही जेव्हा तो फलंदाजीला येतो, तेव्हा चेंडू फिल्डरच्या हातात नाही, तर थेट बाऊंड्री लाईनच्या बाहेर जातात.

लेजेंड्स क्रिकेट लीग स्पर्धेतही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेतील फायनलमध्ये त्याने संघासाठी ३८ चेंडूंचा सामना करत ८५ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाचा विजय खेचून आणला.

अवघ्या १२ चेंडूत चोपल्या ५२ धावा

श्रीनगरच्या बख्शी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात कोनार्क सूर्या ओडीशा आणि साऊदर्न सुपर स्टार्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात कोनार्कला जिंकण्यासाठी १६५ धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना, कोनार्क संघाने १४ षटकात ९१ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. इथून पुढे हा संघ आणखी बॅकफूटवर गेला. कारण १७ षटकात या संघाची धावसंख्या ८ बाद ११८ धावांवर जाऊन पोहोचली. इथून या संघाचा पराभव जवळजवळ निश्चित होता. मात्र युसुफ पठाणने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि हातून निसटलेला सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचवला.

Yusuf Pathan: 6,6,6,6,6,6,6,6...युसुफ पठाणचा कहर! शेवटच्या 12 चेंडूत चोपल्या 52 धावा
IND vs NZ 1t Test Day 2: भारत- न्यूझीलंड सामन्याची वेळ बदलली! किती वाजता सुरु होणार सामना?

युसुफ पठाणचा कहर

युसुफ पठाणने १६ व्या षटकात सुबोध भाटीच्या षटकात २ षटकार खेचले. या षटकात त्याने २४ धावा जमा केल्या. शेवटी या संघाला जिंकण्यासाठी १२ चेंडूत ३५ धावा करायच्या होत्या. त्यावेळी युसुफ पठाणने पवन नेगीच्या षटकात ४ षटकार आणि १ चौकार खेचत २८ धावा चोपल्या. यासह युसुफ पठाणने अवघ्या २ षटकात ५२ धावा जमा करत संघाला विजयापर्यंत पोहोचवलं.

Yusuf Pathan: 6,6,6,6,6,6,6,6...युसुफ पठाणचा कहर! शेवटच्या 12 चेंडूत चोपल्या 52 धावा
IND vs NZ दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर! समोर आलं टेन्शन वाढवणारं कारण

शेवटी हा साामना टाय झाल्याने सुपर ओव्हर पाहायला मिळाली. सुपर ओव्हरमध्येही युसुफ पठाणने षटकार खेचला. कोणार्क संघाला २३ धावांपर्यंत मजल मारता आली. या धावांचा पाठलाग करताना साऊदर्न सुपर स्टार्स संघाकडून मार्टीन गप्टीलने २ षटकार खेचले आणि संघाला विजय मिळवून देत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com