Yusuf Pathan Batting: IPL ची स्वप्न पाहणाऱ्या पाकच्या आमिरला युसूफने दाखवला 'पठाणी' हिसका! एकाच षटकात ठोकल्या २५ धावा - VIDEO

Yusuf Pathan In T-10 League: त्याने महत्वपूर्ण खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.
yusuf pathan
yusuf pathan saam tv
Published On

T-10 League 2023: जीएम एफ्रो टी -१० लीग स्पर्धेचा थरार झिम्बाब्वेमध्ये सुरु आहे. या स्पर्धेत जोबर्ग बफेलोज संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युसूफ पठाणने ताबडतोड फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

या स्पर्धेतील क्वालिफायरचा पहिला सामना डर्बन कलंदर्स आणि जोबर्ग बफेलोज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ४० वर्षीय युसुफ पठाणने आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याने महत्वपूर्ण खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.

yusuf pathan
IND vs WI 2nd ODI: भारत - वेस्टइंडीज दुसरा वनडे सामना होणार रद्द? मोठं कारण आलं समोर

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डर्बन कलंदर्स संघाने १० षटकअखेर ४ गडी बाद १४० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना जोबर्ग बफेलोज संघाकडून युसुफ पठाण चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता.

या डावात त्याने २६ चेंडूंचा सामना करत ३०७ च्या स्ट्राइक रेटने नाबाद ८० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ९ षटकार मारले. या खेळीच्या जोरावर त्याने १ चेंडू शिल्लक ठेवून संघाला सामना जिंकून दिला.

जोबर्ग बफेलोज संघाला या सामन्यात शेवटच्या ३ षटकांमध्ये विजयासाठी ६४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना जोबर्ग बफेलोज संघाने १४ चेंडूंमध्ये हे आव्हान पूर्ण केले. शेवटच्या ३ षटकांमध्ये युसूफ पठाणने ७ षटकार आणि ४ चौकार मारले.

त्याने पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमिरच्या एकाच षटकात ३ षटकार आणि १ चौकार मारत २५ धावा ठोकल्या. (Latest sports updates)

आपल्या संघाला सामना जिंकून दिल्यानंतर युसूफ पठाण जोरदार सेलिब्रेशन करताना दिसून आला होता. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

त्याची ही आक्रमक खेळी पाहून संघातील खेळाडूंचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. तसेच खेळाडू आश्चर्यचकीत झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com