IPL Players Opportunity In Team India: IPL गाजवलेले हे ३ खेळाडू आता क्रिकेट विश्व गाजवणा! लवकरच मिळू शकते टीम इंडियात संधी

Opportunity In Indian Team: कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.
rinku singh
rinku singh saam tv

IPL 2023: आयपीएल स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंचं नशीब चमकलं आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं आहे. या हंगामात देखील काही युवा खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला आहे.

ज्यांनी संधी मिळताच संधीचं सोनं केलं आणि संघासाठी चांगली कामगिरी केली. दरम्यान काही खेळाडू असे देखील आहेत ज्यांना आयपीएल स्पर्धेत केलेल्या जोरदार कामगिरीच्या बळावर लवकरच भारतीय संघात संधी मिळू शकते. कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.

rinku singh
Flop Players In IPL: नाम बडे और दर्शन छोटे..कोट्यवधींची बोली लावूनही फ्लॉप ठरलेले ५ खेळाडू

यशस्वी जयस्वाल( राजस्थान रॉयल्स):

यशस्वी जयस्वाल गेल्या काही हंगामांपासून आयपीएल स्पर्धेचे प्रतिनिधित्व करतोय. मात्र त्याला स्वतःची ओळख निर्माण करता आली नव्हती. आयपीएल २०२३ स्पर्धेत त्याने जोरदार फलंदाजी केली आहे.

त्याने राजस्थान रॉयल्स संघासाठी सलामीला फलंदाजी करताना ४८.०८ च्या सरासरीने ६२५ धावा केल्या. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे. यासह त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या १३ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले होते. ही कामगिरी पाहता तो लवकरच भारतीय संघासाठी खेळताना दिसून येऊ शकतो.

rinku singh
Why RCB Fails In IPL?: RCB चं नेमकं गंडतंय तरी कुठं? १६ वर्षे,अर्धा डझन कर्णधार बदलूनही IPL ची ट्रॉफी नाही! ३ प्रमुख कारणे

रिंकू सिंग( कोलकाता नाईट रायडर्स):

रिंकू सिंग हे नाव आयपीएल २०२३ स्पर्धेत जोरदार गाजतंय. या खेळाडूने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी अशी काही कामगिरी केली आहे, जी यापूर्वी क्वचितच कुठल्या खेळाडूने केली असावी.

त्याने गुजरात टायटन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकात ५ षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. इतकेच नव्हे तर लखनऊ सुपर जायंट्स संगाविरुद्ध झालेल्या निर्णायक सामन्यात देखील त्याने महत्वाची खेळी केली होती.

या सामन्यात जवळ जवळ विजय मिळवून दिला होता. मात्र कोलकाताचा संघ केवळ १ रन मुळे विजयापासून दूर राहिला होता. (Latest sports updates)

rinku singh
Virat Kohli Record: विराट म्हणजे १०१ नंबरी सोनं! शतकी खेळी करत मोडला IPL स्पर्धेतील सर्वात मोठा रेकॉर्ड

जितेश शर्मा (पंजाब किंग्ज )

जितेश शर्माने देखील फिनिशर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करताना १४ सामन्यांध्ये ३०९ धावा केल्या आहेत.

त्याने फिरकी आणि वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळताना नियंत्रणात फलंदाजी केली आहे. यष्टिरक्षक फलंदाज असणाऱ्या जितेश शर्माने शेवटच्या षटकांमध्ये देखील चांगली फलंदाजी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com