Delhi Capitals: दिल्लीच्या नव्या कर्णधाराचं नाव ऐकून व्हाल हैराण; ऋषभ पंतनंतर कोण सांभाळणार कमान?

Delhi Capitals New Captain 2025: ऋषभ पंतनंतर दिल्ली कॅपिटल्स एका चांगल्या कर्णधाराच्या शोधात आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा कोणावर असणार हे पाहावं लागणार आहे.
Delhi Capitals New Captain
Delhi Capitals New Captainsaam tv
Published On

आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार असून त्यासाठी 574 खेळाडूंना शॉर्ट लिस्ट करण्यात आलं आहे. दिल्ली कॅपिटल्स मॅनेजमेंट आयपीएल 2025 साठी एक नवी टीम तयार करण्याच्या तयारीत आहे. मेगा ऑक्शनपूर्वी फ्रँचायझीने केवळ चार खेळाडूंना रिटेन केलं आहे. दिल्लीने त्यांचा कर्णधार ऋषभ पंतलाही रिलीज केलंय. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण असणार आहे, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

ऋषभ पंतनंतर दिल्ली कॅपिटल्स एका चांगल्या कर्णधाराच्या शोधात आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा कोणावर असणार हे पाहावं लागणार आहे.

Delhi Capitals New Captain
IPL 2025 Auction: 13 ते 42...कोण आहे IPL लिलावात नाव नोंदवणारे सर्वात युवा आणि वयस्कर खेळाडू?

काही रिपोर्ट्सनुसार, आता दिल्ली ऋषभ पंतच्या जागी अक्षर पटेलकडे कर्णधारपद सोपवणार आहे. परंतु दिल्ली कॅपिटल्सने अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाहीये. मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती समोर आलीये.

दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंत यांच्यातील संबंध बिघडले असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतनेही तो मेगा ऑक्शनमध्ये भाग घेण्याबाबत ट्विट केलं होत. मात्र ऋषभ पंत मस्करी करतोय, असं चाहत्यांना वाटलं. दरम्यान त्यानंतर पंत आणि दिल्ली यांच्यातील संबंध ठीक नसल्याचं समोर येत होतं. त्यानंतर दिल्लीने पंतला रिलीज केल्यानंतर सर्व अंदाज बरोबर ठरू लागले.

दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला 16.5 कोटी, कुलदीप यादवला 13.25 कोटी, ट्रस्टन स्टब्सला 10 कोटी आणि अभिषेक पोरेलला 4 कोटींमध्ये रिटेन ठेवलंय. पंतला रिलीज केल्यानंतर आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचा कर्णधार कोण असेल याबाबत फ्रँचायझीने कोणतीही घोषणा केलेली नाही.

Delhi Capitals New Captain
IPL 2025 Auction, Players List: 574 खेळाडू लिलावाच्या रिंगणात! या 12 मार्की खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष

आयपीएलच्या २०२५ च्या सिझनसाठी सर्व १० संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केलीये. आयपीएल मेगा ऑक्शन येत्या २४- २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये रंगणार आहे. या लिलावासाठी एकूण १५७४ खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं होतं. मात्र फायनल लिस्टमध्ये केवळ ५७४ खेळाडूंना स्थान देण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com