Marquee Players In IPL 2025 Mega Auction: आयपीएल २०२५ स्पर्धा अतिशय खास असणार आहे. कारण या हंगामात आपले आवडते खेळाडू दुसऱ्या संघातून खेळताना दिसणार आहेत. आगामी हंगामासाठी सर्व १० संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.
तर उर्वरीत सर्व खेळाडूंना रिलीज केलं. हे खेळाडू मेगा ऑक्शनमध्ये दिसणार आहेत. आयपीएल मेगा ऑक्शनचा थरार येत्या २४- २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये रंगणार आहे. या लिलावासाठी एकूण १५७४ खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं होतं.
मात्र फायनल लिस्टमध्ये केवळ ५७४ खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान ५७४ पैकी १२ खेळाडू असे आहेत, ज्यांचा मार्की प्लेअर्समध्ये समावेश करण्यात आला आहे. ज्यात ७ भारतीय आणि ५ परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. कोण आहेत ते खेळाडू ? जाणून घ्या.
इथे पाहा खेळाडूंची संपूर्ण यादी
आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीच्या लिलावासाठी स्टार भारतीय खेळाडूंनी मार्की खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं आहे. या यादीत रिषभ पंत, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल केएल राहुल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना स्थान देण्यात आलं आहे. या खेळाडूंची बेस प्राईज २ कोटी रुपये आहे.
श्रेयस अय्यर गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलची ट्रॉफी उंचावली होती. मात्र केकेआरने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला.
यासह रिषभ पंत आणि केएर राहुल देखील गेल्या हंगामात कर्णधाराच्या भूमिकेत होते, मात्र या हंगामात त्यांना रिलीज करण्यात आलं आहे.
आगामी मेगा ऑक्शनसाठी मार्की खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, डेव्हिड मिलर, जॉस बटलर, मिचेल स्टार्क आणि लियाम लिविंग्सटन यांचा समावेश आह. या खेळाडूंमध्ये डेव्हिड मिलरची बेस प्राईज १.५ कोटी रुपये इतकी आहे. तर उर्वरीत सर्व खेळाडूंची बेस प्राईज ही २ कोटी रुपये इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.