धरमशालेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील शेवटचा कसोटी सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्याच्या एक दिवसापूर्वी आयसीसीने कसोटी रँकिंगची यादी जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये भारताचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालला मोठा फायदा झाला आहे. अवघे ७ कसोटी सामने खेळणाऱ्या यशस्वीने कसोटी रँकिंगमध्ये टॉप १० फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे. तर रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला देखील फायदा झाला आहे. (ICC Test Rankings)
आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत विराट कोहली भारतीय संघाकडून टॉपला आहे. विराट या यादीत आठव्या स्थानी आहे. तर यशस्वी जयस्वालने १० व्या स्थानी सरकला आहे. नुकताच इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत त्यान ६५५ धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने २ दुहेरी शतकं देखील झळकावली आहेत.
चौथ्या कसोटीत रोहित शर्माने देखील शतकी खेळी केली होती. या खेळीच्या बळावर रोहित ११ व्या स्थानी सरकला आहे. तर शुभमन गिल ३१ व्या आणि रविंद्र जडेजा ३७ व्या स्थानी कायम आहे.
तर गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी कायम आहे. यासह आर अश्विन दुसऱ्या स्थानी तर रविंद्र जडेजा ७ व्या स्थानी सरकला आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंचा जलवा...
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने ४ सामन्यांमध्ये सर्वाधिक ६५५ धावा केल्या आहेत.
यादरम्यान त्याने २ दुहेरी शतकं झळकावली आहेत. तर शुभमन गिल सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. गिलने ४ सामन्यांमध्ये ३४२ धावा केल्या आहेत. तर सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी आहे. बुमराहने ३ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना १७ गडी बाद केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.