WTC Final Scenario: न्यूझीलंडविरूद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाचं गणित फिस्कटलं; फायनल गाठण्यासाठी आता कसं आहे समीकरण, पाहा

WTC Final Scenario: बंगळूरू टेस्टमध्ये न्यूझीलंडच्या टीमने भारताचा पराभव केला आहे. मात्र या पराभवामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित फिस्कटलं आहे.
WTC Final Scenario: न्यूझीलंडविरूद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाचं गणित फिस्कटलं; फायनल गाठण्यासाठी आता कसं आहे समीकरण, पाहा
Published On

बंगळूरू टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव जवळपास निश्चित मानला जात होता. या सामन्यामध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा ८ विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडच्या टीमने ३ सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये १-० अशी आगाडी घेतली आहे. तर दुसरीकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचं नुकसान झालं आहे. याचसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्याचं टीम इंडियाचं गणित देखील फिस्कटलं आहे.

बंगळूरू टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव

बंगळूरू टेस्टमधील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. यानंतर सामन्याच्या दुसर्‍या दिवसी टीम इंडियाचे फलंदाज अवघ्या ४६ रन्सवर ऑलआऊट झाले. न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ रन्स करत ३५६ रन्सची आघाडी घेतली. दुसर्‍या डावामध्ये टीम इंडियाने चांगला खेळ केला. ४६२ रन्स करत भारताने १०६ रन्सची आघाडी घेतली. मात्र ही आघाडी पुरेशी नव्हती. अखेरीस सामन्याच्या पाचव्या न्यूझीलंडने २ विकेट्स गमावून पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवला.

WTC Final Scenario: न्यूझीलंडविरूद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाचं गणित फिस्कटलं; फायनल गाठण्यासाठी आता कसं आहे समीकरण, पाहा
Rohit sharma: बंगळूरू टेस्टमध्ये अचानक गोंधळ; सामना संपल्यानंतर अंपायरशी का भिडला रोहित शर्मा?

पॉईंट्स टेबलची परिस्थिती सध्या कशी?

न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतही टीम इंडिया सध्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. सध्या भारत 98 गुण आणि 68.06 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानी कायम आहे. या पराभवामुळे टीम इंडियाला एकही पॉईंट मिळाला नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलिया 90 पॉईंट्सह आणि 62.50 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर या विजयाचा फायदा न्यूझीलंडच्या टीमला झाला आहे. किवींना या विजयामुळे ५ व्या स्थानावरून चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.

फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासाठी कसं आहे समीकरण?

बंगळूरू सामन्यानंतर टीम इंडियाकडे आता केवळ ७ सामने उरले आहेत. WTC फायनलमध्ये सहज पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ७ पैकी 4 टेस्ट जिंकणं आवश्यक आहे.भारताचे फक्त 7 टेस्ट सामने शिल्लक असून भारताला न्यूझीलंडविरुद्धचे उर्वरित दोन्ही टेस्ट सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे किमान २ सामनेही जिंकावे लागणार आहे.

WTC Final Scenario: न्यूझीलंडविरूद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाचं गणित फिस्कटलं; फायनल गाठण्यासाठी आता कसं आहे समीकरण, पाहा
Ind vs NZ Test : बंगळूरूमध्ये न्यूझीलंडच किंग; तब्बल 36 वर्षांनंतर भारताच्या भूमीवर किवींचा विजय

सोपा मार्ग कोणता?

बंगळूरूच्या पराभवामुळे टीम इंडियाचं गणित काहीसं कठीण झालं आहे. मात्र फायनल गाठण्यासाठी कोणतंही जर तरच समीकरण ठेवायचं नसेल तर एक सोपा मार्ग आहे. यामध्ये टीम इंडियाला पुढील 2 सामन्यांमध्ये न्यूझीलंडला हरवणं आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात 3 टेस्ट जिंकणं हा सर्वात सोपा मार्ग आहे. असं झाल्यास भारत सलग तिसरी WTC फायनल खेळू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com