WPL 2023, MI Vs GG : मुंबई इंडियन्सचा धमाका; गुजरातचा ६४ धावांतच खुर्दा, एकटी हरमनप्रीत अख्ख्या संघाला पडली भारी

WPL 2023, MI Vs GG Match Updates : महिला प्रीमिअर लीग २०२३ (WPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्स संघानं गुजरात जायंट्सला १४३ धावांनी पराभूत केलं.
WPL 2023, MI Vs GG
WPL 2023, MI Vs GGWPL/Twitter

WPL 2023, MI Vs GG Match Updates : महिला प्रीमिअर लीग २०२३ (WPL 2023) मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघानं पहिल्याच सामन्यात धमाकेदार विजय मिळवला. गुजरात जायंट्सला १४३ धावांनी पराभूत केलं. कर्णधार हरमनप्रीत अख्ख्या गुजरात संघाला भारी पडली.

महिला प्रीमिअर लीगचा पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात झाला. शनिवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सनं विजय मिळवला. (Cricket News)

WPL 2023, MI Vs GG
IND VS AUS indore test: 'भारताने मुद्दाम खराब खेळपट्टी बनवली..' ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूची जहरी टीका

पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत कौरचा (Harmanpreet Kaur) जलवा बघायला मिळाला. तिच्या फलंदाजीनं डोळ्यांचे पारणे फेडले. अवघ्या ३० चेंडूंत ६५ धावांची धुवाधार खेळी केली. तर गुजरात जायंट्सला अवघ्या ६४ धावाच करता आल्या. एकट्या हरमनप्रीतनं केलेल्या धावाही अख्ख्या गुजरात संघाला करता आल्या नाहीत.

WPL 2023, MI Vs GG
WPL 2023 : MI विरुद्धच्या सामन्याआधी गुजरातला तगडा झटका, दुखापतीमुळं ऑलराउंडर संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

नाणेफेक गमावलेला मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मुंबईने ५ विकेट गमावून २०७ धावा केल्या. हरमनप्रीतनं या सामन्यात ३० चेंडूंत ६५ धावांची स्फोटक खेळी केली. तिनं १४ चौकार तडकावले. हेली मॅथ्यूज हिनं ४७ धावा, तर अमेलिया केर हिने ४५ धावांची सुरेख खेळी केली.

२०८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरात संघाला १५.१ षटकांत ६४ धावाच करता आल्या. गुजरात संघाला १४३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गुजरात संघाची कर्णधार बेन मुथी दुखापतीनंतर पुन्हा फलंदाजीला उतरली देखील नाही.

हरमनप्रीतचे सलग ७ चौकार

गुजरात संघाविरुद्ध हरमनप्रीत कौर हिनं २२ चेंडूंत अर्धशतक तडकावलं. या खेळीत हरमनप्रीतनं गुजरातच्या दोन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तिनं ७ चेंडूंवर लागोपाठ ७ चौकार ठोकले. तिनं मोनिका पटेलच्या षटकात शेवटच्या ४ चेंडूंवर ४ चौकार तडकावले. तर त्यानंतर अॅश्ले गार्डनर हिच्या षटकात दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर आलेल्या हरमनप्रीतनं लागोपाठ तीन चौकार कुटले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com