
WPL 2023: विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेला आजपासून जोरदार प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुध्द गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. मात्र स्पर्धेतील पहिल्याच लढतीत गुजरात जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाली आहे.
गुजरात जायंट्स संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू डीएंड्रा डॉटिन संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाली आहे. तिच्या ऐवजी ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज किम गार्थची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.(Latest sports updates)
डीएंड्रा डॉटिन संपूर्ण स्पर्धेतून बाहेर...
डीएंड्रा डॉटिन ही या स्पर्धेतून बाहेर झाली आहे याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. मात्र गुजरात जायंट्स संघाने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की ऑस्ट्रेलियाची खेळाडू गुजरात जायंट्स संघात प्रवेश करणार आहे.
काही दिवसांपूर्वी तिने ऑस्ट्रेलिया संघासाठी पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यावर तिने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळण्यापूर्वी तिने १० वर्षे आयर्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११
मुंबई इंडियन्स:
हरमनप्रीत कौर( कर्णधार), अमनजोत कौर, हेली मॅथ्युज, यस्तिका भाटिया, नेट स्किवर,क्लो ट्रायॉन, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर,इसी वोंग, सोनम यादव, सायका इशाक
गुजरात जायंट्स :
बेथ मुनी( कर्णधार), सबबिनेनी मेघना, डीएंड्रा डॉटिन ,सोफिया डंकले, गार्डनर, हरलीन देओल, सुषमा वर्मा, स्नेह राणा, मानसी जोशी, तनुजा कंवर, मोनिका पटेल
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.