Rohit Sharma: रोहित शर्मा फीट असूनही प्लेईंग ११ मधून का बाहेर? चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न

Rohit Sharma injury update: आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात रोहित शर्मा फिट असूनही प्लेईंग ११ मध्ये नसल्याने चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दोन नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
Rohit Sharma injury update
Rohit Sharma injury updatesaam tv
Published On

आयपीएल २०२६ मध्ये आज ३० वा सामना रंगलाय. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी सुरु आहे. आजच्या सामन्यात सर्वांचं लक्ष होतं ते रोहित शर्माकडे. रोहित शर्माच्या आजच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र सर्वांच्या अपेक्षेवर पाणी फेरलं गेलं. कारण आजच्या प्लेईंग ११ मध्ये रोहित शर्माला स्थान देण्यात आलेलं नाही.

रोहित शर्मा फीट की अनफीट?

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्या सामन्यात दुखापतग्रस्त होऊन मैदान सोडून परतला होता. त्यानंतर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो पंजाब किंग्सविरुद्धचा आधीचा सामना खेळू शकला नव्हता. मात्र रोहित शर्मा फीट असल्याची माहिती सामन्यापूर्वी असल्याने तो आजच्या सामन्यात खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत पारस म्हाम्ब्रे यांनी सांगितलेलं की, रोहित शर्मा आणि सँटनर दोघंही फीट आहेत. त्यांनी सांगितलं होतं की, रोहित नेटमध्ये फलंदाजी केली आणि तो त्याच्या फीटनेसवर काम करतोय.

Rohit Sharma injury update
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? 'हार्दिक सेना' पॉइंट टेबलमध्ये शेवटून पहिली, असं आहे सध्याचं समीकरण

चाहत्यांच्या मनात प्रश्न कायम

दरम्यान रोहित शर्मा फीट असूनही त्याचा प्लेईंग ११ मध्ये समावेश न केल्याने सर्वांच्या मनात मोठा प्रश्न उपस्थित होतोय. गेल्या सामन्यात फीटनेसमुळे त्याला बाहेर ठेवण्यात आलं होतं. मात्र आजच्या सामन्यात फीट असूनही त्याला संधी न दिल्याने चाहते काहीसे नाराज आहेत.

दोन नव्या खेळाडूंना संधी

आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी दानिश मालेवार आणि क्रिश भगत यांना मुंबई इंडियन्सकडून डेब्यू संधी मिळाली आहे. विदर्भाचा फलंदाज असलेल्या दानिशने गेल्या ऑगस्टमध्ये दुलीप ट्रॉफीमध्ये २०३ रन्स करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मुंबई फ्रँचायझीने त्याला ३० लाख रुपयांना आपल्या ताफ्यात घेतलं होतं.

Rohit Sharma injury update
Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आमदाराचा पुतण्या, कोण आहे क्रिश भगत?

दानिश व्यतिरिक्त या सामन्यासाठी क्रिश भगतलाही डेब्यूची संधी दिली आहे. अथर्व अंकोलेकरच्या जागी सिझन्या मध्यात त्याची निवड झाली. तो मुंबई फ्रँचायझीमध्ये तो ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सामील झालाय.

Rohit Sharma injury update
IPL 2026: चिन्नास्वामीवर आज रंगणार IPL चा महासंग्राम, पाहा किती वाजता सुरु होणार सामना, कशी असेल प्लेईंग ११?

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११

दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिळक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, क्रिश भगत, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com