Rohit Sharma Statement: विंडीजविरुद्धची वनडे मालिका टीम इंडियासाठी महत्वाची का आहे? स्वतः हिटमॅनने सांगितलं कारण

IND vs WI: काय आहे यामागचं कारण? याचा खुलासा स्वत: कर्णधार रोहित शर्माने केला आहे.
rohit sharma
rohit sharmasaam tv
Published On: 

Rohit Sharma On IND vs WI ODI Series: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये नुकताच २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत १-० ने विजय मिळवला आहे.

ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. मालिकेतील पहिला वनडे सामना २७ जुलै रोजी बार्बाडोसच्या मैदानावर रंगणार आहे.

ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. काय आहे यामागचं कारण? याचा खुलासा स्वत: कर्णधार रोहित शर्माने केला आहे.

rohit sharma
IND vs WI ODI Series Details: कुठे, केव्हा अन् कधी रंगणार भारत-वेस्टइंडीज पहिला वनडे सामना? पाहा एकाच Click वर..

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कर्णधार रोहित शर्माने या मालिकेचं महत्व सांगितलं आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. त्यांना एक्सपोझर द्यायला हवं. यादरम्यान ते ज्या भुमिकेत फलंदाजी करतात, त्या ठिकाणी त्यांना खेळायची संधी मिळायला हवी. त्यानंतर ते दिलेल्या संधीचा कसा फायदा घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.'

तसेच रोहित शर्मा पुढे म्हणाला की, ' गतवर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकापू्र्वी देखील आम्ही या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित केले होते की,नवख्या खेळाडूंना संधी मिळायला हवी. त्यानंतर ते कशी कामगिरी करतात याचा आम्ही आढावा घेतला. इथे आम्हाला ३ सामने खेळायचे आहेत. इथे कोणाला संधी देता येईल, काय करता येईल, काय नाही करावं या सर्व गोष्टींचा विचार करून आन्ही निर्णय घेऊ.' (Latest sports updates)

rohit sharma
IND vs WI Playing 11: पहिल्या वनडेत रोहित 'या' खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता; पाहा संभावित प्लेइंग 11

पहिल्या वनडे सामन्यासाठी अशी असु शकते भारतीय संघाचा प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन/ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव/अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर,मुकेश कुमार/जयदेव उनाडकट आणि उमरान मलिक.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.