Hardik Pandya: हार्दिकला भारतीय संघात का घेतलं? समोर आलं मोठं कारण

Hardik Pandya, T20 World Cup 2024: हार्दिक पंड्याला आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्वपद दिलं गेलं. ज्यावेळी त्याला ही जबाबदारी दिली गेली, त्यावेळी क्रिकेट फॅन्स नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते.
Hardik Pandya: हार्दिकला भारतीय संघात का घेतलं? समोर आलं मोठं कारण
why hardik pandya given chance in team india for t20 world cup 2024 know the reason amd2000twitter

हार्दिक पंड्याला आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्वपद दिलं गेलं. ज्यावेळी त्याला ही जबाबदारी दिली गेली, त्यावेळी क्रिकेट फॅन्स नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते. कारण रोहितला कर्णधार पदावरुन काढून ही जबाबदारी त्याच्याकडे सोपवली गेली होती. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला.

यासह त्याला फलंदाजीत आणि गोलंदाजीतही चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र तरीदेखील त्याची टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. आता त्याला संघात घेण्यामागचं खरं कारण समोर आलं आहे.

एका वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना हार्दिक पंड्या भारतीय संघात नको होता. आयपीएल २०२४ स्पर्धेतील १३ सामन्यांमध्ये त्याला १८.२ च्या सरासरीने त्याला अवघ्या २०० धावा करता आल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने ११ गडी बाद केले आहेत.

काही दिवसांपूर्वी टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात हार्दिक पंड्याला स्थान दिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत रोहित शर्मा आणि अजित आगरकरांना हार्दिक पंड्याला संघात घेण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, सध्या असा कुठलाच भारतीय खेळाडू नाही जो, हार्दिक पंड्याची जागा घेऊ शकतो, त्यामुळे हार्दिक पंड्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे.

Hardik Pandya: हार्दिकला भारतीय संघात का घेतलं? समोर आलं मोठं कारण
IPL 2024 Playoffs: केव्हा आणि कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? तिकिटांची किंमत किती? वाचा एकाच क्लिकवर

रोहित- हार्दिकमध्ये वाद?

आयपीएल २०२४ स्पर्धेदरम्यान रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यात वाद असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान देखील खेळाडू दोन गटात विभागले गेल्याचे पाहायला मिळाले होते. वृत्तानुसार बीसीसीआयचे काही अधिकारी हार्दिक पंड्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहत आहेत. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.

Hardik Pandya: हार्दिकला भारतीय संघात का घेतलं? समोर आलं मोठं कारण
IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

राखीव खेळाडू - शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com