CSK Ban: धोनीच्या CSK वर 2 वर्षांचा बॅन का लावला होता? कारण अनेकांना माहीत नसेल

Why CSK Banned For 2 Years: चेन्नई सुपर किंग्ज संघावर २ वर्षांचा बॅन का लावण्यात आला होता. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.
CSK Ban: धोनीच्या CSK वर 2 वर्षांचा बॅन का लावला होता? कारण अनेकांना माहीत नसेल
CSK Saam tV
Published On

एमएस धोनी कर्णधार, मॅथ्यू हेडन, सुरेश रैना, मायकल हसी आणि रविंद्र जडेजा असे दिग्गज खेळाडू असलेला संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज संघ. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक.

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून ते आतापर्यंत या संघाने ५ वेळेस आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. मात्र २ वर्ष हा संघ गायब होता. या संघावर २ वर्षांचा बॅन लावण्यात आला होता. हा बॅन नेमका कशासाठी लावला होता? काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

आयपीएलच्या सुरुवातीपासून एमएस धोनी या संघाचं नेतृत्व करतोय. मात्र गेल्या हंगामात एमएस धोनीने ही जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली. आगामी हंगामातही तो भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

CSK Ban: धोनीच्या CSK वर 2 वर्षांचा बॅन का लावला होता? कारण अनेकांना माहीत नसेल
IND vs NZ: टीम इंडिया तर मालामाल पण न्यूझीलंडवरही पैशांचा पाऊस; पाहा दोन्ही संघांना किती मिळाली प्राईज मनी

बॅन लागण्याचं कारण काय?

आयपीएलमध्ये कोट्यवधींचा सट्टा लावला जातो. ही स्पर्धा सुरु असताना सट्टेबाजीची अनेक प्रकरणं समोर येत असतात. चेन्नई सुपर किंग्ज संघावरही सट्टेबाजीमुळे बंदी घालण्यात आली होती. २०१३ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील फायनलच्या सामन्याच्या दिवशी गुरुनाथ मयप्पनला अटक करण्यात आली होती.

CSK Ban: धोनीच्या CSK वर 2 वर्षांचा बॅन का लावला होता? कारण अनेकांना माहीत नसेल
Ind vs Nz Live : लाइव्ह सामन्यादरम्यान चाहते गौतम गंभीरवर भडकले, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

गुरुनाथला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. यासह राजस्थान रॉयल्स फ्रेंजायझीचा मालक राज कुंद्रावर देखील स्पॉट फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर जुलै २०१५ मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश आरएम लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यांची समिती नियुक्ती केली होती

CSK Ban: धोनीच्या CSK वर 2 वर्षांचा बॅन का लावला होता? कारण अनेकांना माहीत नसेल
IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या सीझनमधील सर्व संघांच्या खेळाडूंची यादी एका क्लिकवर..

मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळून आल्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांवर २०१६ आणि २०१७ असा २ वर्षांसाठी बॅन लावण्यात आला होता. यादरम्यान धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता.

चेन्नई सुपर किंग्ज संघावर असलेला बॅन २०१८ मध्ये संपला. त्यानंतर चेन्नईचा संघ पुन्हा एकदा मैदानात उतरला आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने २०१८ मध्ये आयपीएलची ट्रॉफी उंचावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com