Arshad Khan: हार्दिक पंड्याला आणखी एक पर्यायी ऑलराउंडर सापडला? कोण आहे अरशद खान?
who is lsg new big hitter arshad khan know in marathi amd2000saam tv

Arshad Khan: हार्दिक पंड्याला आणखी एक पर्यायी ऑलराउंडर सापडला? कोण आहे अरशद खान?

Who Is Arshad Khan In Marathi: हा सामना लखनऊ एकतर्फी गमावणार असं वाटत असताना अरशद खान आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेलं.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने शानदार कामगिरी केली आणि लखनऊवर १९ धावांनी विजय मिळवला. हा सामना जरी दिल्लीने जिंकला असला तरी मन मात्र लखनऊच्या अरशद खानने जिंकला.

दिल्लीच्या खेळाडूंनी लखनऊच्या नवाबांचा चांगलाच पाहुणचार केला. मात्र संघ अडचणीत असताना एकट्या अरशद खान लढला. त्याने संघाला विजयाच्या जवळ पोहचवलं. मात्र त्याला कोणाचीही साथ न मिळाल्याने दिल्लीला हा सामना गमवावा लागला आहे.

हा सामना जिंकण्यासाठी लखनऊला २०९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना संघातील प्रमुख फलंदाज एकापाठोपाठ माघारी परतले. कर्णधार केएल राहुलही संघाला चांगली सुरुवात करुन देऊ शकला नाही. हा सामना लखनऊ एकतर्फी गमावणार असं वाटत असताना अरशद खान आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेलं. त्याने या डावात ३३ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १७५.७६ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ५८ धावांची खेळी केली.

Arshad Khan: हार्दिक पंड्याला आणखी एक पर्यायी ऑलराउंडर सापडला? कोण आहे अरशद खान?
IPL Playoffs Scenario: दिल्लीच्या विजयाचा RCB ला फायदा! प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; या संघाचं टेन्शन वाढलं

अरशद आहे तरी कोण?

अरशद खानचा जन्म मध्य प्रदेशच्या गोपालगंजमध्ये झाला. २७ वर्षीय अरशद खानने अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. उजव्या हाताने गोलंदाजी आणि डव्या हाताने फलंदाजी करणारा हा अष्टपैलू खेळाडू आपल्या भन्नाट वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. यासह त्याच्याकडे फलंदाजीला येऊन मोठे फटके खेळण्याची क्षमता देखील आहे. या सामन्यात अर्धशतकी खेळी करत त्याने १ गडी देखील बाद केला.

Arshad Khan: हार्दिक पंड्याला आणखी एक पर्यायी ऑलराउंडर सापडला? कोण आहे अरशद खान?
IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

अरशदला घडवण्यात त्याच्या वडिलांचा मोलाचा वाटा आहे. त्याचे वडील अशफाक यांनी सिवनी जिल्ह्यातील क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. लहानपणापासूनच तो चांगला खेळायचा. या शानदार कामगिरीच्या बळावर त्याने मध्य प्रदेशच्या अंडर १४ आणि अंडर १६ संघात स्थान मिळवलं होतं.

त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्याने अंडर १९ आणि अंडर २३ संघात स्थान मिळवलं. २०२० मध्ये झालेल्या सीके नायडू ट्रॉफी स्पर्धेतही त्याने शानदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत फलंदाजीत त्याने ४०० धावा कुटल्या. तर गोलंदाजी करताना त्याने ३६ गडी बाद केले होते.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर २०२२ मध्ये झालेल्या लिलावात त्याला मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात स्थान दिलं होतं. त्याला २०२३ मध्ये या संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला ६ सामन्यांमध्ये ५ गडी बाद केले. त्यानंतर २०२४ स्पर्धेपूर्वी त्याला रिलीझ करण्यात आलं. आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात लखनऊ सुपरजायंट्स संघाने त्याला २० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com