Rohit Sharma Funny Video: 'पाकिस्तानचा सर्वात हार्ड बॉलर कोण?' रोहितचं भन्नाट उत्तर पत्नी रितिकालाही हसू अनावर; पाहा VIDEO

Rititka Sajdeh Reaction: रोहितचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Rohit sharma viral video
Rohit sharma viral video saam tv
Published On: 

Funny Cricket Video: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून दुर आहे . भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. यापूर्वी झालेल्या वनडे मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून आला होता.

सध्या तो अमेरिकेत आहे. इथे त्याने वर्ल्डकपच्या एका इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता. यादरम्यान एक मजेशीर किस्सा घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Rohit sharma viral video
IND vs WI Weather Update: निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी!तिसरा सामना रद्द होण्याची शक्यता? हे आहे मोठं कारण

रोहित शर्मा मैदानावर असताना आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी तर मैदानाबाहेर असताना तो आपल्या मजेशीर स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच त्याला, पाकिस्तान संघातील सर्वात हार्ड बॉलर कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताच उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना हसु आवरलं नाही.

रोहित शर्माला विचारलं गेलं होतं की, 'पाकिस्तान संघातील हार्ड बॉलर कोण? यावर उत्तर देताना तो म्हणाला की, 'सर्वच चांगले बॉलर आहेत.. मी कोणाचं नाव घेणार नाही. नाव घेतल्यास मोठी कॉन्ट्रोवर्सी होतेय. एक नाव घेतलं तर दुसऱ्याला वाईट वाटेल,सर्वच गोलंदाज चांगले आहेत.'रोहितचं हे उत्तर ऐकून कोणालाच हसू आवरलं नाही. त्याची पत्नी रितीका सजदेहला देखील हसू आवरलं नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

यापू्र्वी देखील रोहित शर्माच्या मजेशीर मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. २०१९ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघाविरूद्ध खेळताना १४० धावांची खेळी केली होती. त्यावेळी रोहित शर्माला विचारण्यात आले होते की, 'तू पाकिस्तानच्या फलंदाजांना काय टिप्स देशील? या प्रश्नाचे उत्तर देत तो म्हणाला होता की,'मी जर त्यांचा फलंदाजी प्रशिक्षक झालो तर नक्कीच त्यांना टिप्स देईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.