Sunil Gavaskar: 'विंडीजसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध धावा करून काय उपयोग?',सुनील गावसकरांचा रोहित अन् विराटला सवाल

Sunil Gavaskar On Rohit Sharma: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.
sunil gavaskar
sunil gavaskar saam tv
Published On: 

Sunil Gavaskar On Virat Kohli And Rohit Sharma: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये नुकताच २ कसोटी सामान्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने १-० ने विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता.

तर मालिकेतील दुसरा सामना ड्रॉ झाला. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मासह, विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालने शतके झळकावली. मात्र या चमकदार कामगिरीनंतरही माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

sunil gavaskar
IND vs WI ODI Series Details: कुठे, केव्हा अन् कधी रंगणार भारत-वेस्टइंडीज पहिला वनडे सामना? पाहा एकाच Click वर..

मिड डेमध्ये लिहलेल्या कॉलममध्ये सुनील गावसकरांनी म्हटले की, 'वेस्टइंडीजच्या अटॅकविरूद्ध रोहित आणि विराटने केलेल्या धावा निवडकर्त्यांना एकच प्रश्न विचारताय, ते म्हणजे या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देता आली असती का. यावरून असं दिसतं की, निवडकर्ते कुठलेही चॅलेंज स्वीकारण्याच्या तयारीत नाही. आता अजित आगरकर मुख्य निवडकर्ते बनले आहेत, आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की, ते युवा खेळाडूंचा वापर कसा करतात.'

तसेच ते विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकी खेळीबद्दल बोलताना म्हणाले की, ' रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वेस्टइंडीज सारख्या दुबळ्या संघाविरूध्द धावा केल्याचा काय उपयोग? जो संघ वर्ल्ड कपसाठीही पात्र ठरू शकला नाही अशा संघाविरूद्ध धावा करून तुम्ही निवड समितीला काय सांगु इच्छित आहात.' (Latest sports updates)

sunil gavaskar
Cricket Viral Crush Video: फलंदाजाला बॉल लागला, ती मैदानात धावत आली अन् मोक्कार भाव खाऊन गेली

कसोटी मालिका झाल्यानंतर आता भारतीय संघ वेस्टइंडीज संघाविरूद्ध वनडे मालिकेत दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना २७ जुलै रोजी बार्बाडोसच्या मैदानावर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.