WFI Membership Suspended: भारताला मोठा झटका! भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द, युनायटेड वर्ल्ड रेसलिंगकडून कारवाई

Membership Of Indian Wrestling Federation Suspended: भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
WFI Membership Suspended
WFI Membership SuspendedSaam Tv
Published On: 

Wrestling Federation of India: भारतातील कुस्तीपटूंसाठी मोठी बातमी आहे. जागतिक कुस्ती महासंघ म्हणजेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (United World Wrestling) भारतीय कुस्ती महासंघाविरोधात (Wrestling Federation of India) कठोर कारवाई करत सदस्यत्व रद्द केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केल्यामुळे आगामी जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना भारताच्या झेंड्याखाली स्पर्धेत सहभाग घेण्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

WFI Membership Suspended
Rolls-Royce Accident: १० कोटींची कार, १० मिनिटांत जळून खाक! दिल्ली - मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

१६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक क्वालिफाइड वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना 'तटस्थ खेळाडू' म्हणून सहभागी व्हावे लागेल. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांचा कार्यकाळ बऱ्याच दिवसांपूर्वी संपला आहे. यानंतर कुस्ती संघटनेच्या निवडणुका घेण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा निवडणुकीच्या तारखा निश्चित केल्या. मात्र विविध राज्य कुस्ती संघटनांच्या याचिकांच्या आधारे विविध उच्च न्यायालयांनी निवडणुकीला स्थगिती दिली. याच कारणास्तव कुस्ती संघटनेच्या निवडणुका आतापर्यंत झालेल्या नाहीत. या निवडणुका न झाल्याचा परिणाम आता भारताला सहन करावा लागत आहे.

WFI Membership Suspended
Himachal Pradesh Buildings Collapsed : अवघ्या काही सेकंदात पत्त्यांसारख्या कोसळल्या ७ इमारती, कुल्लूमधील थरारक व्हिडीओ आला समोर

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ३० मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाला पत्र पाठवत सांगितले होते की, जर ४५ दिवस म्हणजेच १५ जुलैपर्यंत भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक झाली नाही तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द करेल. असे असताना देखील भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली नाही.

भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका अनेक वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक राज्यांतील कुस्ती महासंघ सध्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर समाधानी नसून त्यांच्या याचिकेवरून कुस्ती महासंघांच्या निवडणुकांवर अनेकदा बंदी घालण्यात आली आहे. याच कारणामुळे जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केले आहे.

WFI Membership Suspended
Chandrayaan 3 Landing Record : चांद्रयान-3 च्या लँडिंगदरम्यान इस्रोच्या नावे असाही एक रेकॉर्ड, नेमकं काय झालं?

भारतीय कुस्ती महासंघाला यापूर्वी जानेवारीत आणि पुन्हा मे महिन्यात निलंबित करण्यात आले होते. यावेळी भारतातील आघाडीच्या कुस्तीपटुंनी कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिज भूषण यांच्यावर महिला कुस्तीपटुंच्या लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. यासोबतच कुस्तीपटूंनी संघटनेच्या कार्यप्रणालीला देखील विरोध केला होता. भारतीय कुस्ती महासंघाचे दैनंदिन व्यवहार सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेने स्थापन केलेल्या भूपेंद्र सिंग बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे व्यवस्थापित केले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.