भारताने चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी यशस्वीपणे चंद्रावर लँड झालं. प्रत्येक भारतीयासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. यासह इस्रोचे यूट्यूब चॅनल जगातील सर्वाधिक पाहिले जाणारे लाइव्ह YouTube चॅनेल बनले आहे. याआधी लाईव्हमध्ये सर्वाधिक पाहिले गेलेले चॅनल 6.3 मिलियनसह टॉपव होते. पण इस्रोच्या यूट्यूब चॅनेलने 8.5 मिलियनहून अधिक थेट यूजर्ससह हा विक्रम मोडला आहे.
चांद्रयान-3 च्या लँडिंगबद्दल यूजर्स इतके उत्सुक होती की YouTube चॅनेलवर थेट लँडिंग पाहण्यासाठी लाखो लोक आले होते. इस्त्रोच्या यूट्यूब चॅनेलवर जेवढे सबस्क्रायबर्स आहेत, त्यापेक्षा जास्त लोक ते लाईव्ह पाहत होते.
चांद्रयान 3 च्या 'लाइव्ह स्ट्रीमिंग'ने जागतिक रेकॉर्ड मोडले. इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर लँडिंग होताना सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटाला तब्बल 80,59,688 जणांनी लाईव्ह पाहिलं.
फिफा विश्वचषक 2022 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत ब्राझील विरुद्ध क्रोएशिया सामन्यादरम्यान 6.3 मिलियन यूजर्स मिळवणाऱ्या युट्यूबर कॅसिमिरोच्या नावावर यापूर्वीचा विक्रम होता. (Latest News Update)
प्रज्ञान रोवर चंद्रावरील पणी, माती, वातावरणासोबत खनिज याबाबतची माहिती गोळा करुन पाठवेल. दक्षिण ध्रुवावर अशी काही ठिकाणं आहेत, जिथे अद्यापही सूर्यप्रकाश पडलेला नसून अब्जावधी वर्षांपासून अंधार आहे. अशा ठिकाणावरुन डेटा गोळा करणे रोवरसाठी ऐतिहासिक असेल. रोवरच्या या कामगिरीमुळे अनेक प्रकराच्या संशोधनाला चालना मिळेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.