Chandrayaan-3: PM मोदींचा थेट दक्षिण आफ्रिकेतून इस्रो प्रमुख सोमनाथ यांना फोन, कौतुकाचा वर्षाव

Chandrayaan-3: चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतून इस्रो प्रमुख सोमना यांना फोन केला.
Chandrayaan-3: PM मोदींचा थेट दक्षिण आफ्रिकेतून इस्रो प्रमुख सोमनाथ यांना फोन, कौतुकाचा वर्षाव
Published On

Narendra modi News: भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्याने देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतून इस्रो प्रमुख सोमना यांना फोन केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या सर्व टीमचं कौतुकावर वर्षावर केला. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. चांद्रयान-३ मोहीमेच्या ऐतिहासिक क्षणाच्या वेळी पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतून होते. चांद्रयान-३ ची सॉफ्ट लँडिग त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून पाहिली. नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतून इस्रो प्रमुख सोमनाथ यांना फोन करून अभिनंदन केलं.

Chandrayaan-3: PM मोदींचा थेट दक्षिण आफ्रिकेतून इस्रो प्रमुख सोमनाथ यांना फोन, कौतुकाचा वर्षाव
Pm Narendra Modi On Chandrayaan 3: इतिहास घडताना डोळ्यांनी पाहिला; चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रो प्रमुखांना म्हणाले, 'सोमनाथजी, तुमचं नाव सोमनाथ आहे. तुमच्या सोमनाथ नावाचं चंद्राशी कनेक्शन आहे. आजच्या ऐतिहासिक क्षणामुळे तुमचं सर्व कुटुंब आनंदीत असेल. माझ्याकडून संपूर्ण टीमचं अभिनंदन. तुमच्या सर्व टीममधील सदस्यांना माझ्याकडून अभिनंदन सांगा. मी लवकरंच येऊन सर्व टीमचं अभिनंदन करणार आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. ओके. नमस्कार'. (Narendra Modi Latest News)

Chandrayaan-3: PM मोदींचा थेट दक्षिण आफ्रिकेतून इस्रो प्रमुख सोमनाथ यांना फोन, कौतुकाचा वर्षाव
ANI Twitter Locked : ट्विटरने 'एएनआय'चे अकाउंट केले लॉक, जाणून घ्या काय आहे कारण

चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

भारताची चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आज इतिहास घडताना डोळ्यांनी पाहिला. ऐतिहासिक क्षण पाहून धन्य झालो. हा क्षण अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. चांद्रयान मोहीमेचा हा क्षण १४० कोटी भारतीयांच्या आशेचा आहे. यामुळे नव्या चेतना आणि उर्जेचा आहे. हा क्षण नव्या भारताचा आहे'.

'मी खूप आनंदी आहे.प्रत्येक भारतीयांसोबत आनंद साजरा करण्यासाठी उत्सूक आहे. मी सर्व इस्रो, सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com