

Virender Sehwag : भारतातील प्रसिध्द उद्योजक गौतम अदानी गेल्या काही दिवसांपासुन प्रचंड चर्चेत आहेत. हिंडनबर्गच्या एका रिपोर्टमुळे भारतीय शेअर बाजारात मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. या रिपोर्टमुळेच गौतम अदानी यांना मोठा आर्थिक फटका देखील बसला आहे.
दरम्यान हे प्रकरण चांगलच गाजत असताना आता माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने देखील या प्रकरणात उडी घेत, मोठे वक्तव्य केले आहे. त्याचे एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Virender Sehwag News)
वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये लिहले की, " या गोऱ्या लोकांना भारतीय पुढे जात आहेत हे पाहवत नाही. भारतीय बाजाराला टार्गेट करण्यासाठी हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. तुम्ही किती ही प्रयत्न करा, भारत देश आणखी मजबूत होऊन याचा सामना करेल.
" वीरेंद्र सेहवागने हे ट्विट करताना गौतम अदानी यांचा उल्लेख केला नाहीये. मात्र लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत वीरेंद्र सेहवाग हा गौतम अदानीच्या संघाचे प्रतिनिधित्व करतो, यावरून असे तर्क लावले जात आहेत की, वीरेंद्र सेहवागने हे ट्वीट गौतम अदानी यांना समर्थन करण्यासाठी केले आहे.
वीरेंद्र सेहवागने केलेल्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, "भारत तर मजबूतच आहे, केवळ अदानी कमकुवत झाले आहेत." तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की,"आपले सर्व पैसे अदानीच्या शेअर्समध्ये गुंतवून चांगलेच सडेतोड उत्तर द्या गोऱ्या लोकांना.." तर आणखी एका युजरने त्याला प्रश्न विचारत लिहिले की," अदानी ग्रुपमध्ये तुम्ही किती गुंतवले आहेत.?"
क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी करणारा वीरेंद्र सेहवाग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे अनेक ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र या ट्वीटमुळे नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच फिरकी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.