Virat Kohli Record : आयपीएल २०२३ मध्ये आज, सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने असतील. या सामन्यात सगळ्यांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. सध्या हा विक्रमादित्य जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. आता कोहली इकाना स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत एक नवा विक्रम रचू शकतो.
विराट कोहली (Virat Kohli) हा मागील आयपीएल स्पर्धेत काही खास कामगिरी करू शकला नव्हता. एकेक धावेसाठी त्याला संघर्ष करावा लागत होता. कधी यश आलं तर कधी धडपडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याच्यावर खराब फॉर्ममुळे टीका झाली. पण या सगळ्यावर मात केली आणि आता यंदाच्या आयपीएलमध्ये तो धावांचा रतीब घालतोय. (Latest sports updates)
विराट कोहली आता इतिहास रचणार आहे. तो आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तर आहेच, त्यात आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहे.
कोहलीच्या आयपीएल (IPL 2023) कारकीर्दीबाबत सांगायचे झाले तर, या दिग्गज फलंदाजाने २३१ सामन्यांतील २२३ डावांमध्ये ६९५७ धावा केल्या आहेत. ३६.६२ इतकी धावांची सरासरी आहे, तर स्ट्राइक रेट १२९.७२ चा आहे.
कोहलीने आयपीएलमध्ये एकूण पाच शतके, तर ४९ अर्धशतके केली आहेत. लखनऊच्या विरोधात कोहलीने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली तर, तो सात हजार धावा पूर्ण करू शकेल. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरेल.
विराट कोहली आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. ते बघता लखनऊच्या विरुद्ध होणाऱ्या सामन्यातच तो या विक्रमाला गवसणी घालू शकतो. कोहलीनं या सामन्यात अर्धशतकी खेळी केली तर, तो अर्धशतकांचे अर्धशतकही पूर्ण करेल.
याबाबतीत त्याची पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनशी स्पर्धा आहे. धवन याचीही ४९ अर्धशतके आहेत.तर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या २१२ सामन्यांत ६५०६ धावा आहेत.
कोहलीने यंदाच्या मोसमात झोकात सुरुवात केली आहे. तो ८ सामने खेळला आहे. त्यात ३३३ धावा केल्या आहेत. धावांची सरासरी ४७.५७ आहे. तर स्ट्राइक रेट १४२ पेक्षा जास्त आहे. आठ सामन्यांत त्याने ५ अर्धशतके ठोकली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.