टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन याने शनिवारी त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दरम्यान एक वेळ अशी होती ज्यावेळी विराट आणि शिखर धवन यांच्यामध्ये झालेल्या वादाने क्रिकेट जगतात मोठी खळबळ माजली होती. तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीला प्रेस कॉन्फन्स घेत या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. नेमकं हे प्रकरण काय आहे ते पाहूयात.
2014-15 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान एका पत्रकाराने तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विराट कोहली आणि शिखर धवन यांच्यातील 'कथित' वादाबाबत प्रश्न विचारला होता. यानंतर धोनीने त्याच्याच शैलीत या प्रश्नाचं उत्तर दिलं. दरम्यान धोनीने ज्या पद्धतीने उत्तर दिलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
धोनी म्हणाला होता, 'हो, हो, विराट आणि शिखरमध्ये भांडण झालं होतं. त्यावेळी विराटने चाकू काढला आणि शिखरला मारला. तो बरा झाल्यावर आम्ही त्याला फलंदाजीला पाठवलं. आता यावर एखादा सिनेमा बनवायला हवा.
वादाच्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना धोनी म्हणाला, 'हे सर्व खोटं आहे, प्रत्यक्षात असं काहीही घडलेलं झालं नाही. मार्वल्स आणि वॉर्नर ब्रदर्सने ही गोष्ट वापरून सिनेमा बनवावा. हा नक्कीच एक चांगला सिनेमा बनेल.
2014 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात ब्रिस्बेन टेस्ट ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर विराट कोहली आणि शिखर धवन यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये भांडण झाल्याची बातमी समोर आली होती. या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शिखर धवन आणि विराट कोहली यांच्यात फलंदाजीवरून वाद झाला. यानंतर हा वाद इतका वाढला की, तत्कालीन टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांना हे प्रकरणात मध्यस्ती करावी लागली होती.
त्यावेळी दुसऱ्या टेस्टमध्ये टीमच्या पराभवानंतर धोनीने पराभवाची कारणं सांगताना म्हटलं की, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या. दरम्यान या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचा ओपनर मॅथ्यू हेडननेही भारतीय टीमची निंदा केली
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.