Virat Kohli : विराट कोहलीचं शतक हुकलं; पण सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडला

Virat Kohli News : ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात विराट कोहलीचं शतक हुकलं. मात्र, त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडला आहे. यामुळे त्याचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
Virat Kohli Record
virat kohli sachin tendulkaryandex
Published On

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरोधात तुफान फलंदाजी केली आहे. कोहलीने दुबईतील मैदानात कठीण परिस्थितीत भारताचा मोर्चा सांभाळला. मात्र, ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात विराट कोहलीचं शतक थोडक्यात हुकलं. या सामन्यात आयसीसी नॉकआऊट सामन्यात १ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला. त्याचबरोबर आयसीसींच्या स्पर्धांमध्ये २४ वेळा ५० हून अधिक संख्या करण्याचा सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे.

Virat Kohli Record
New Zealand Cricket: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा करार जाहीर; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनवणाऱ्या केन विल्यमसनलाच केलं ऑऊट

कोहलीने आयसीसी वनडे टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक ५० हून अधिक धावसंख्या करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ५३ इनिंगमध्ये २४ वेळा ५० हून अधिक धावा कुटल्या आहेत. सचिनने त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये आयसीसी वनडे टूर्नामेंटमध्ये ५८ इनिंगमध्ये २३ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. तर या यादीत भारताचा हिटमॅन रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ४२ इनिंगमध्ये १८ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत.

Virat Kohli Record
New Rule In Cricket: क्रिकेटमध्ये स्टम्पिंग अन् रनआऊटचा नियम बदलणार! WPL मध्ये लागू केला नवा नियम

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगाकाराने ५६ इनिंगमध्ये १७ वेळा ५० हून अधिक धावसंख्या करण्याचा रेकॉर्ड करत चौथ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने ६० इनिंगमध्ये १६ वेळा ५० हून अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे.

Virat Kohli Record
Ron Draper Cricketer Death: सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटरचं निधन; कारकिर्दीत फक्त केल्या 25 धावा

कोहलीने सर्व वनडे सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना ८ हजार धावा पूर्ण करण्याची किमया केली आहे. धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर पहिल्या सचिन तेंडुलकर आहे. सचिनने वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करत असताना एकूण ८७२० धावा कुटल्या आहेत. या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने एकूण ६११५ धावा कुटल्या आहेत. त्यानंतर अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर सनथ जयसूर्या, दक्षिण आफ्रिकेचा जॅक्स कॅलिस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com