
विराट कोहली सध्या भारतात कमी आणि लंडनमध्येच जास्त दिसून येतो. जेव्हा जेव्हा तो ऑन ड्यूटी नसतो, तेव्हा तो आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये असतो. या महिन्यांपूर्वी अकायचा जन्म झाला होता. त्याचा जन्मही लंडनमध्येच झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु होती की, विराट कोहली क्रिकेटला रामराम केल्यानंतर लंडन शिफ्ट होणार. आता या अफवांवर विराट कोहलीचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
राजकुमार शर्मा हे विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मते विराट निवृत्तीनंतर, भारत सोडून कायमचा लंडनमध्ये शिफ्ट होणार आहे. राजकुमार शर्मा यांनी सांगितले की, 'विराट कोहली आपल्या पत्नी आणि मुलांसह लंडनमध्ये शिफ्ट होण्याच्या तयारीत आहे. तो लवकरच भारत सोडून लंडनला शिफ्ट होणार आहे.'
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना झाल्यानंतर आर अश्विनने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. ही घोषणा केल्यानंतर संघातील वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील चर्चेत आले आहेत. हे दोघेही चाळीशीच्या जवळ आहेत.
दोघेही फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसून येत आहेत. बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत रोहितचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. तर विराट ऑफ साईडच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर बाद होताना दिसतोय. विराट फ्लॉप होत असला, तरीदेखील त्याच्या बालपणीच्या प्रशिक्षकांना वाटतंय की, त आणखी काही वर्ष क्रिकेट खेळू शकतो.
राजकुमार शर्मा विराटच्या फॉर्मबद्दल म्हणाले, ' तो आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रिकेट खेळतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने शतक झळकावलं आहे. येणाऱ्या पुढील २ सामन्यांमध्ये तो आणखी २ शतकं झळकावेल.' असा विश्वास राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
बॉर्डर- गावसकर मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. या मालिकेतील तिसरा चौथा कसोटी सामना येत्या २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. हा सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.