वेडिंग पार्टीत विराट कोहलीचा 'पुष्पा' डान्स; व्हिडिओ झाला व्हायरल

Virat Kohli Dance Video: लग्नाच्या वेडिंग पार्टीत डान्स करतानाचा विराटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाआहे.
वेडिंग पार्टीत विराट कोहलीचा 'पुष्पा' डान्स; व्हिडिओ झाला व्हायरल
Published On: 

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर आणि रॉयल चॅलेंजर बंगळूरू (RCB) संघाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा नुकताच विवाहबंधनात (Glenn Maxwell Wedding) अडकला. आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मॅक्सवेलने त्याची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमणसोबत (Vini Raman) लग्नगाठ बांधली. १८ मार्च रोजी दोघांचे लग्न झाले. अशातच आयपीएलचा हंगाम निम्मा संपत आला असताना मॅक्सवेलने आरसीबी संघाला त्याच्या लग्नाची पार्टी दिली. या पार्टीत आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीसह (Virat Kohli) इतर खेळाडूही सामील झाले होते. (Virat Kohli Dance In Pushpa Song In Glenn Maxwell Wedding Party)

वेडिंग पार्टीत विराट कोहलीचा 'पुष्पा' डान्स; व्हिडिओ झाला व्हायरल
भारताचा 'हा' खेळाडू होणार टेस्ट क्रिकेटचा कर्णधार? युवराज सिंगनं दिली प्रतिक्रिया

सध्या या पार्टीचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये विराट कोहली हा 'पुष्पा' या दक्षिणात्य चित्रपटातील एका गाण्यावर डान्स(Virat Kohli Dance Video) करताना दिसत आहे. विराटने आपल्या सहकाऱ्यांसोबत पुष्पा चित्रपटातील 'ओ अंटावा' या गाण्यावर चांगलाच ठेका धरला. लग्नाच्या वेडिंग पार्टीत डान्स करतानाचा विराटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या आनंदात २७ एप्रिलला आरसीबी फ्रँचायझीने मॅक्सवेलला ही पार्टी दिली. या पार्टीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा नवा कर्णधार फाफ डू प्लेसिस त्याची पत्नी इमारी विसेर, विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा तसेच आरसीबी संघाचे इतर सदस्य सामील झाले होते. अनुष्काने विराटसोबतचा पार्टीतला फोटो देखील शेअर केला आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळणारा मॅक्सवेल २०१७ ला एका कार्यक्रमादरम्यान भारतीय वंशाच्या विनी रमनच्या प्रेमात पडला. तेव्हापासून तो विनी रमनला डेट करत होता. काही दिवसांपूर्वीच तामिळ पद्धतीने दोघांचेही लग्न झाले. यंदाच्या हंगामात झालेल्या महालिलावात आरसीबीने मॅक्सवेलला संघात कायम ठेवले होते. आयपीएल २०२२ स्पर्धेत आरसीबीने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी ५ सामन्यांत विजय मिळवला असून ४ सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. सध्या आरसीबीचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.