Virat Kohli Record : रनमशीन कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड; थेट तेंडुलकर-गावसकर क्लबमध्ये एन्ट्री

Virat Kohli 9000 test runs : भारताचा रनमशीन आणि विक्रमादित्य विराट कोहलीनं शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ९००० धावांचा टप्पा गाठला. कोहलीने ११६ सामन्यांत ९००० हून अधिक धावा केल्या. भारताकडून हा विराट टप्पा गाठणारा कोहली चौथा भारतीय फलंदाज आहे.
Virat Kohli record
Virat Kohli recordBCCI/X
Published On

Virat Kohli Test Record : क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खोऱ्यानं धावा ओढणारा विक्रमादित्य, रनमशीन विराट कोहली यानं न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करतानाच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण केल्या. या सामन्याच्या आधी त्याला हा टप्पा गाठण्यासाठी ५३ धावांची गरज होती. पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला होता. पण दुसऱ्या डावात त्यानं सावध खेळी करत अर्धशतकी खेळी साकारली.

विराट कोहली (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला. भारताकडून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांनी हा कारनामा केला आहे. पण कोहलीला हा टप्पा गाठण्यासाठी सर्वाधिक डावा खेळावे लागले आहेत. त्याने १९७ डावांत या विक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ९००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा १८ वा फलंदाज आहे. याआधी विराट कोहलीने २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं.

कसोटीत २९ शतके, ३१ अर्धशतके

भारताचा (Team India) माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीनं आतापर्यंतच्या कसोटी कारकि‍र्दीत (Test cricket) ११६ सामने खेळताना ९००० हून अधिक धावा केल्या आहेत. त्यात त्याने २९ शतके झळकावली आहेत. तर त्यात सात द्विशतके आहेत. विराटने ३१ अर्धशतकेही ठोकली आहेत. २५४ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे.

सर्वात वेगवान ९ हजार धावा कुणाच्या नावावर

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये ९००० धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज आणि विकेटकीपर कुमार संगकारा याच्या नावावर आहे. त्याने अवघ्या १७२ डावांमध्ये हा टप्पा गाठला आहे. स्टीव्ह स्मिथ याने १७४ डावांमध्ये ९००० धावा केल्या आहेत. तर भारताचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याबाबतीत तिसऱ्या स्थानी आहे.

Virat Kohli record
India vs New Zealand : विराट कोहली आणि सरफराजने डाव सावरला; भारताचं जोरदार कमबॅक, न्यूझीलंडकडे १२५ धावांची आघाडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com