ICC T 20 Ranking : वरुण चक्रवर्तीची मोठी झेप; टॉप ५ गोलंदाज, फलंदाज कोण? वाचा

ICC T 20 Ranking List : आयसीसी टी २० रँकिंगमध्ये भारताचा फिरकीपटू वरूण चक्रवर्तीनं तुफान कामगिरी करत मोठी झेप घेतली आहे. तो थेट टॉप ५ मध्ये पोहोचला आहे. तर तिलक वर्मानं इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांत तडाखा दिला तर, तो अव्वल स्थानी पोहोचू शकतो.
Varun chakravarthy and Tilak Verma
Varun chakravarthy and Tilak Vermasaam tv
Published On

आयसीसीच्या टी २० रँकिंगमध्ये भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा पाहायला मिळतोय. भारतीय बॉलर वरूण चक्रवर्ती यानं थेट टॉप ५ मध्ये स्थान मिळवलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात केलेल्या कामगिरीमुळं त्याच्या रँकिंगमध्ये २५ स्थानांची सुधारणा झाली आहे. तर गोलंदाजीत आदिल रशीद अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. टी २० रँकिंगमध्ये ऑलराउंडर म्हणून हार्दिक पंड्या क्रमांक एकवर आहे.

तिलक वर्मा पहिल्या स्थानी घेणार झेप

सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी २० मालिकेत भारताचा फलंदाज तिलक वर्मा बॅटमधून खोऱ्यानं धावा ओढत आहे. तो जबरदस्त फॉर्मात आहे. पहिल्या दोन सामन्यांत त्यानं तुफानी खेळी केली होती. तिसऱ्या सामन्यात त्याची बॅट तळपली नाही. मात्र, तरीही तो रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तिलक वर्माचे सध्या ८३२ गुण आहेत. ट्रॅविस हेड हा ८५५ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तिलक वर्माने उर्वरित दोन सामन्यांत तडाखेबंद खेळी केली तर, तो पहिल्या स्थानी पोहचू शकेल.

वरूण चक्रवर्ती इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेआधी टॉप २० मध्ये सुद्धा नव्हता. मात्र, मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत त्यानं इंग्लंडला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. या तिन्ही सामन्यांत त्यानं १० विकेट घेतल्या आहेत. त्याचा फायदा त्याला रँकिंगमध्ये झाला आहे. तो सध्या टॉप ५ मध्ये पोहोचला आहे. आदिल रशीद हा क्रमांक एकवर आहे. अकील हुसैनला त्यानं मागे टाकलं आहे. अक्षर पटेललाही चांगलाच फायदा झाला आहे. मात्र, तो अजूनही टॉप १० मधून बाहेर आहे. जोफ्रा आर्चर टॉप १०मध्ये पोहोचला आहे.

Varun chakravarthy and Tilak Verma
IND vs ENG: असं कोण खेळतं? हार्दिकच्या फ्लॉप शोनंतर दिग्गज खेळाडू भडकला, गंभीरलाही झापलं

पाकिस्तानचा नोमान अली हा आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ९व्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तर साजिद खान २१ व्या स्थानी आहे. वेस्टइंडीजच्या जोमेल वॉरिकननं जबरदस्त गोलंदाजी केली असून, १५ स्थानांची झेप घेतली आहे. तरीही तो २५ व्या स्थानी आहे.

Varun chakravarthy and Tilak Verma
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा रेकॉर्ड, 91 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलंय!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com