Tokyo Olympics: हॉकीत भारताच्या लेकी हरल्या पण सर्वांची मनं जिंकली

भारतीय महिला हॉकी संघाला स्पर्धेमध्ये पदक मिळाले नसले तरी त्यांनी आपली छाप सोडली आहे. भारताच्या चंदेरी पदकावर ग्रेट ब्रिटनने पाणी फिरवत ४- ३ असा सामना जिंकत रौप्य पदक पटकावले आहे.
Tokyo Olympics: हॉकीत भारताच्या लेकी हरल्या पण सर्वांची मनं जिंकली
Tokyo Olympics: हॉकीत भारताच्या लेकी हरल्या पण सर्वांची मनं जिंकलीSaam Tv

Tokyo Olympics : टोकियो ऑलिंपिक Tokyo Olympics मध्ये हॉकीत hockey भारतीय Indian महिलांनी women परत एकदा जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत चांगली फाईट केली आहे. परंतु, ग्रेट ब्रिटनने Great Britain ​भारताचा ४- ३ असा पराभव करत चंदेरी पदकापासून वंचित ठेवले आहे. यामुळे भारताचे स्वप्न भंगले आहे. स्पर्धेमध्ये भारतीय महिला हॉकी संघाला पदक मिळाले नसले तरी त्यांनी आपली छाप मात्र सोडली आहे.

भारताच्या चंदेरी पदकावर ग्रेट ब्रिटनने पाणी फिरवत ४- ३ असा सामना जिंकत रौप्य पदक पटकावले आहे. या सामन्या मध्ये पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही टीमला एकही गोल करता आला नाही. पण दुसरा १५ मिनिटांचा क्वार्टर नाट्यमय झाला आहे. ग्रेट ब्रिटने आक्रमक खेळ करत १६ व्या मिनिटात १ गोल केला आहे. १- ० अशी पहिला आघाडी घेतली आहे. यानंतर याच क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनने ही आघाडी मजबूत करत २- ० अशी केली आहे.

हे देखील पहा-

पण भारतीय महिलांनी जबरदस्त कमबॅक केले होते. यामध्ये गुरजीत कौरने भारताला परत सामन्यात आणले आहे. यानंतर एका मिनिटांच्या अंतराने भारताला बॅक टू बॅक २ पेनॉल्टी कॉर्नर मिळाले आहे. त्यातील एक कॉर्नर गोलमध्ये परावर्तीत केला होता. या गोलनंतर भारताचे मनोबल इतके वाढले, की गुरजीत कौरने परत आपला जलवा दाखवत आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला २- २ अशी बरोबरी मिळवून दिलेली आहे.

यानंतर भारतीय महिलांच्या ताळमेळ इतका चांगला झाला आहे की, याच क्वार्टरच्या समाप्तीला वंदना कटारियाने आणखीन १ गोल करत २- ० ने मागे आसलेल्या भारताने ३- २ अशी आघाडी घेतली होती. धूम- धडाक्यात सामन्यात वापसी केली आहे. हाफ टाईम पर्यंत भारताने ही आघाडी कायम ठेवत पुरुषांप्रमाणे महिलांनी चांगल्या प्रकारचा खेळ केला आहे.

भारतीय लेकींच्या या खेळीने भारतीय फॅन्सच्या मनात पदाकाची आशा आणखीन घट्ट झाली आहे. तिसऱ्या क्वार्टर मध्ये पहिल्याच मिनिटाला ग्रेट ब्रिटला पेनल्टी कॉर्नर मिळाला आहे. परंतू, भारताचा डिफेन्स सतर्क होता. त्यांनी हा पेनल्टी कॉर्नर वाचविले आहे. परंतु ,ग्रेट ब्रिटनने ३ हाफमध्ये भारतावर गोल करत पुन्हा ३- ३ अशी बरोबरी साधली आहे. या क्वार्टन ग्रेट ब्रिटनच्या पारड्या गेला आहे.

Tokyo Olympics: हॉकीत भारताच्या लेकी हरल्या पण सर्वांची मनं जिंकली
Tokyo Olympics: कुस्तीमध्ये रवीला रौप्य तर दिपक पुनिया चितपट

या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनला अनेक संधी मिळाली. परंतु, भारतीय संघाने आणि गोलकिपर सविता पुनियाने त्याला गोलमध्ये परावर्तीत होऊच दिले नाही. तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटाला भारतीय संघाला १ पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, त्यामध्ये त्यांनी चांगला प्रसत्न केला होता. पण हा प्रयत्न गोल भारताला गोल देऊ शकला नाही. तिसरा क्वार्टरमध्ये ३- ३ असा स्कोर होता.

चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टमध्ये सुरुवातीच्या ३ मिनीटांमध्ये ग्रेट ब्रिटनला सलग ४ पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यात ४ पेनल्टी कॉर्नरमध्ये ग्रेट ब्रिटनच्या वॉलसनने त्याला गोलमध्ये परावर्तीत केले आहे. ४- ३ आशी ग्रेट ब्रिटनने आघाडी घेतली आहे. ती शेवटपर्यंत कायम ठेवत भारताच्या चंदेरी पदकावर ग्रेट ब्रिटनने पाणी फिरवत ४- ३ असा सामना जिंकत रौप्य पदक पटकावले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com