Tilak Varma: टीम इंडियाला मिळाला मोठा चेस मास्टर; कोहली, धोनीपेक्षा आहे शानदार फिनिशर

Tilak Varma Chase Master In Team India : टीम इंडियाला विराट कोहली आणि एमएस धोनीपेक्षाही मोठा चेस मास्टर मिळाला आहे. या नवीन तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा दिसत आहे. धावांचा पाठलाग करता केलेल्या धावांची आकडेवारी पाहून कोहली, धोनीला विसरून जाल.
Tilak Varma Chase Master  In Team India
Tilak Varma celebrating after a match-winning knock, emerging as Team India’s new chase master in T20 Internationals.saam tv
Published On
Summary
  • टीम इंडियाला तिलक वर्माच्या रूपाने नवा चेज मास्टर मिळाला आहे.

  • टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात तिलक वर्माची सरासरी सर्वाधिक आहे.

  • विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर चेज मास्टरची जागा रिक्त होती.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघानं शानदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्याविरुद्ध झालेल्या टी२० सामने आणि एकदिवसीय सामन्यात भारतीय संघानं आपल्या नावाचा डंका वाजवला. परंतु टीम इंडियाला फिनिशर खेळाडू बाबत चिंता लागून होती. फिनिशर म्हणजे असा खेळाडू जो कोणत्याही परिस्थितीत मैदानात फलंदाजीसाठी उतरला तरीही तो एक हाती संघला विजयाकडे घेऊन जाईल. विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय.

Tilak Varma Chase Master  In Team India
Lionel Messi: लिओनेल मेस्सीला क्रिकेटच्या देवानं दिली खास भेट; वानखेडेवर गुंजला सचिन अन् मेस्सीच्या नावाचा गजर

कोहली भारताच्या टी-२० संघाचा शानदार रन चेज खेळाडू होता. त्यामुळे त्याला रन मशीन म्हणतात. पण कोहलीने निवृत्ती घेतल्यानंतर रन चेज करणाऱ्या खेळाडूची कमतरता संघाला भासत होती. परंतु आता ही जागा डावखुरा फलंदाज तिलक वर्माने भरून काढलीय. जर आकडेवारीनुसार पाहिलं तर तिलक वर्मा आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि एमएस धोनीपेक्षा मोठा रन चेज करणारा मास्टर बनलाय.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना किमान ५०० धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिलक वर्मा यांची सरासरी सर्वाधिक आहे. पूर्ण खेळाडूंच्या यादी पाहिली तर आपल्याला विराट कोहली आतापर्यंत अव्वल स्थानावर असल्याचं दिसत होता. ज्याची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करण्याची सरासरी ६७.१ होती, परंतु तिलक वर्माने विराट कोहलीला मागे टाकलंय.

Tilak Varma Chase Master  In Team India
IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना तिलक वर्माची धावांची ६८ आहे. दरम्यान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी आहे, ज्याची या फॉरमॅटमध्ये दुसऱ्या डावात धावा करण्याची सरासरी ४७.७१ आहे. दक्षिण आफ्रिकेचा जेपी ड्युमिनी चौथ्या स्थानावर होता, त्याने सरासरी ४५.५५ धावा केल्या. तर कुमार संगकारा टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सरासरी ४४.९३ धावा करत यादीत पाचव्या स्थानावर होता.

टी२० मध्ये सर्वोत्तम फलंदाजीची सरासरी (किमान ५०० धावा करणारे खेळाडू)

६८.० - तिलक वर्मा*

६७.१ - विराट कोहली

४७.७१ - एमएस धोनी

४५.५५ - जेपी ड्युमिनी

४४.९३ - के संगकारा

तिलक वर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रमांक ३ चा खेळाडू आहे. त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या क्रमांकावरून खेळताना दोन शतके झळकावली आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये या स्थानावरून त्याने शतकांची हॅटट्रिक देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com