Women’s T20 World Cup Scenarios: रन रेट तर सुधारलं पण सेमीफायनलचं काय? पाहा कसं आहे भारतासाठी सेमीफायनलचं समीकरण

Women’s T20I World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपमधील ग्रुप स्टेजमधील आता दुसरा सामना टीम इंडियाच्या मुलींनी जिंकला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवून नेट रनरेट सुधारला आहे. त्यामुळे आता सेमीफायनलसाठी समीकरण कसं असणार आहे ते पाहूयात.
Women’s T20 World Cup Scenarios
Women’s T20 World Cup Scenariossaam tv
Published On

भारतीय महिलांची क्रिकेट टीम टी-२० च्या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करतायत. बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेच्या मुलींचा पराभव केला आणि सेमीफायनल गाठण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया वर्ल्डकपची सेमीफायनल गाठणार का, असा सवाल चाहत्यांच्या मनात होता. मात्र ग्रुप स्टेजमधील आता दुसरा सामना टीम इंडियाच्या मुलींनी जिंकला आहे.

टी-२० वर्ल्डकपच्या स्पर्धेची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने झाली होती. हा पराभव हाती लागताच भारताच्या सेमीफायनलच्या आशांना धक्का बसला होता. पण, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीमने पाकिस्तान आणि श्रीलंका यांना पराभूत करून सेमीफायनलच्या शर्यतीत अजून आपलं स्थान कायम राखलं आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवून नेट रनरेट सुधारला आहे.

Women’s T20 World Cup Scenarios
IND vs BAN, 2nd T2OI: टीम इंडियाच्या विजयाची सप्तमी! बांगलादेशला नमवत मालिकेत घेतली २-० ची विजयी आघाडी

टीम इंडियाच्या मुलींची थेट दुसऱ्या स्थानी धडक

श्रीलंकेच्या टीमचा ९० रन्समध्ये रोखल्यामुळे नेट रनरेटमध्ये भारताने न्यूझीलंडच्या टीमला मागे टाकलंय. त्यामुळे आता टीम इंडियाचा रन रेट प्लसमध्ये पोहोचला आहे. भारताने ९० रॅन्सच्या आता श्रीलंकेला गुंडाळलं आणि नेट रनरेटमध्ये पाकिस्तानला देखील धक्का दिला आहे. भारताचा नेट रन रेट आता ०.५७६ झाला. यावेळी भारत ४ पॉईंट्सह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट ०.५५५ इतका आहे, तर न्यूझीलंडचा रन रेट -०.०५० इतका आहे.

कसं आहे आता सेमीफायनलचं समीकरण?

भारतीय टीमसाठी सेमीफायनल गाठण्याचं समीकरण काहीसं सोपं झालं आहे. टीम इंडियाचे तीन सामन्यांत चार पॉईंट्स आहेत. भारतीय टीमला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. टॉप फोरमध्ये स्थान मिळवण्यासाठी टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावंच लागणार आहे. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान टीम इंडियासाठी काहीसं कठीण मानलं जातंय.

Women’s T20 World Cup Scenarios
IND vs SL W : भारताच्या लेकींनी श्रीलंकेला चारली धूळ; टॉप-२ मध्ये हरमनसेनेची एन्ट्री

टीम इंडियाला श्रीलंकेवर दणदणीत विजय

महिला २० वर्ल्ड कप २०२४ च्या १२ व्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ८२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात श्रीलंकेला जिंकण्यासाठी १७३ रन्सचं आव्हान देण्यात आलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची संपूर्ण टीम अवघ्या ९० रन्सवर पव्हेलियनमध्ये परतली. भारतीय टीमकडून गोलंदाजी करताना अरुंधती रेड्डी आणि सोभानाने प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com