Ind vs Eng: 27 शतकं ठोकणाऱ्या खेळाडूची चौथ्या टेस्टमध्ये होणार एन्ट्री; गेल्या २ सिरीजमध्येही मिळाली नव्हती संधी

India Test series: भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये ५ सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. या सिरीजमध्ये ३ सामने खेळले गेले असून २ सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
India Test series
India Test seriessaam tv
Published On
Summary
  • भारत-इंग्लंड टेस्ट सिरीजमध्ये भारत २-१ ने पिछाडीवर असून, चौथी टेस्ट मॅनचेस्टरमध्ये खेळवली जाणार आहे.

  • अभिमन्यु ईश्वरनला पहिल्यांदाच प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

  • इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन अनौपचारिक टेस्टमध्ये ईश्वरनने अर्धशतकं झळकावून दमदार कामगिरी केली होती.

सध्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये ५ सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. या सिरीजमध्ये टीम इंडिया २-१ ने पिछाडीवर आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये भारताला अगदी शेवटच्या क्षणाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता चौथा सामना मॅनचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात जिंकण्यासाठी टीम इंडिया एक बदल करण्याची शक्यता आहे.

असा अंदाज बांधला जातोय की, स्थानिक क्रिकेटमध्ये चांगला खेळ दाखवणाऱ्या अभिमन्यु ईश्वरनला चौथ्या टेस्टमध्ये संधी दिली जाऊ शकते. अभिमन्यू ऑस्ट्रेलियाविरूद्ध २०२४-२५ च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपासून टीम इंडियाच्यासोबत आहे. मात्र त्याला डेब्यू करण्याची संधी मिळाली नाही.

India Test series
Ind Vs Eng 4th Test : चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह- रिषभ पंत खेळणार? टीम इंडियाबाबत मोठी माहिती समोर

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी सिरीजपूर्वी भारत अ टीमने इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन अनौपचारिक टेस्ट सामने खेळले होते. या दोन्ही सामन्यांत भारत अ टीमचं नेतृत्व अभिमन्यू ईश्वरनने केलं होतं आणि त्याने अत्यंत दमदार कामगिरी केली होती. दोन्ही सामन्यांत अर्धशतकं झळकावलं होतं. विशेषतः दुसऱ्या सामन्यात त्याने 80 रन्सची महत्त्वाची खेळी केली होती.

ही कामगिरी पाहता अनेकांना अपेक्षा होती की टेस्ट सामन्यांत त्याला प्लेईंग ११ मध्ये संधी दिली जाईल असं मानलं जातं होतं. मात्र, तसं झालं नाही आणि पहिल्या तीन टेस्टमध्ये त्याला संधीच मिळाली नाही.

India Test series
Rohit Virat controversy: रोहित शर्मा, विराट कोहलीला निवृत्ती घ्यायला भाग पाडलं का? बीसीसीआयनं अखेर सोडलं मौन

करुण नायर आणि साई सुदर्शनची निराशाजनक कामगिरी

लीड्स टेस्टमध्ये टीम मॅनेजमेंटने ईश्वरनवर विश्वास न दाखवता साई सुदर्शन आणि करुण नायर यांना संधी दिली. मात्र, दोघांची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. करुण नायरने पहिल्या डावात शून्यावर बाद होऊन दुसऱ्या डावात केवळ 20 रन्सची खेळी केली. साई सुदर्शनही पहिल्या डावात शून्यावर बाद झाला आणि दुसऱ्या डावात 30 रन्स केले. या कामगिरीनंतर पुढील एजबॅस्टन टेस्टमध्ये सुदर्शनला टीमबाहेर केलं गेलं, पण करुणला मात्र संधी मिळत राहिली. आणि पुन्हा एकदा ईश्वरनकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

India Test series
Shubman Gill : इंग्लंड टीम विरोधात खेळताना भारताचं कुठं चुकलं? कर्णधार शुभमन गिलने स्पष्टच सांगितलं

अभिमन्यू ईश्वरनचा फर्स्ट क्लास रेकॉर्ड

ईश्वरन हा फर्स्ट क्लास क्रिकेटमधील अतिशय अनुभवी आणि कामगिरी करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 103 फर्स्ट क्लास सामन्यांत 48.70 च्या सरासरीने 7841 रन्स केले आहेत. यामध्ये त्याने 27 शतकं आणि 31 अर्धशतकं ठोकली आहेत.

वनडे फॉरमॅटमध्येही त्याचा अनुभव मोठा आहे. त्याने 89 वनडे सामन्यांत 47.03 च्या सरासरीने 3857 रन्से केले आहेत. तर टी-20 फॉरमॅटमध्ये देखील त्याने 34 सामन्यांत 37.53 च्या सरासरीने 976 रन्स केलेत.

Q

भारत सध्या इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये कोणत्या स्थितीत आहे?

A

भारत ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे.

Q

अभिमन्यु ईश्वरनला कोणत्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे?

A

मॅनचेस्टरमध्ये होणाऱ्या चौथ्या टेस्टमध्ये संधी मिळू शकते.

Q

इंग्लंड लायन्सविरुद्ध ईश्वरनची कामगिरी कशी होती?

A

त्याने दोन्ही सामन्यांत अर्धशतकं मारली आणि दुसऱ्या सामन्यात 80 रन्सची महत्त्वाची खेळी केली.

Q

करुण नायर आणि साई सुदर्शनची कामगिरी का चर्चेत आहे?

A

कारण दोघांनीही लीड्स टेस्टमध्ये अत्यंत निराशाजनक फलंदाजी केली.

Q

अभिमन्यू ईश्वरनचा फर्स्ट क्लास रेकॉर्ड कसा आहे?

A

त्याने 103 फर्स्ट क्लास सामन्यांत 7841 रन्स करताना 27 शतकं आणि 31 अर्धशतकं ठोकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com