

टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये (2020 Summer Olympics) इतिहास घडणार आहे. यावर्षीच्या स्पर्धेत प्रथमच ट्रान्सजेंण्डर अर्थात तृतीयपंथी स्पर्धक भाग घेणार आहेत. न्यूझीलंड ऑलिम्पिक समितीने (NZOC) त्यांच्या देशाची वेलिफ्टर लॉरेल हबार्ड (Weightlifter Laurel Hubbard) या तृतीयपंथी व्यक्तीची निवड केली आहे. लॉरेल 87 किलोच्या वरच्या वजनी गटात खेळताना दिसणार आहे. 2012 साली झालेल्या स्पर्धेत लॉरेल पुरुष गटातून खेळताना दिसली होती.
2015 साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने नियमांमध्ये बदल केला होता. त्यामध्ये सांगितले होते तृतीयपंथी स्पर्धकांचे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण मर्यादित असते त्यामुळे कोणत्याही नियमांचे उल्लंघन होत नाही. त्यामुळे तृतीयपंथी स्पर्धकांना महिला गटातून खेळण्यास काही हरकत नाही. आणि याच नियमांच्या आधारे लॉरेल हबार्डची निवड करण्यात आली आहे.
लाॅरेल हबार्डने या आधी अनेक जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतला असून तिने विविध पदक मिळवले आहेत. लॉरेल 43 वर्षीय असून आठ वर्षांपूर्वी तिच्या हार्मोन्समध्ये बदल झाले असल्याचे सांगितले जातंय. मला अशी संधी मिळाली त्यामुळे सर्वांचे आभार मानते अशी भावना लॉरेलने व्यक्त केली आहे.
लॉरेलची आतापर्यंतची कारकीर्द
2017 च्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने दुसरा क्रमांक पटकावला होता. त्याचबरोबर 2019 मध्ये 6 व्या क्रमांकावर तिला समाधान मानावे लागले होते. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये 2019 आणि 2017 मध्ये अनुक्रमे 1 क्रमांक पटकावला होता. ओशिनिया चॅम्पियनशिपमध्ये लॉरेलने 2017 आणि 2019 मध्ये अनुक्रमे 1 पहिला क्रमांक पटकावला आहे. लॉरेल जागतिक क्रमवारीत 16 व्या क्रमांकावर आहे.
Edited By : Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.