

आगामी वर्ल्डकप २०२३ स्पर्धा भारतात रंगणार आहे. येत्या ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी बीसीसीआयने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण केलं आहे.
भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा व्हिडिओ बीसीसीआय आणि आदिदासने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील स्टार खेळाडू शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज असल्याचं दिसून येत आहे. भारतीय संघाने आतापर्यंत १९८३ आणि २०११ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जेतपदाला घातली आहे. आता भारतीय संघ तिसऱ्यांदा जेतेपद जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तीन का ड्रीम असं या व्हिडिओचं थीम साँग आहे.
काय आहे वेगळेपण..
वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघ नवीन जर्सी घालून उतरणार आहे. या जर्सीतील नवी गोष्ट म्हणजे, आदिदासच्या ३ पट्ट्यांऐवजी खांद्यावर तिरंगी रंगाच्या ३ पट्ट्या आहेत. तसेच बीसीसीआयच्या लोगोच्या वर २ स्टार्स आहेत जे १९८३ आणि २०११ वर्ल्डकप विजयाची आठवण करून देतात. (Latest sports updates)
या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:
रोहित शर्मा( कर्णधार), शुबमन गिल,विराट कोहली ,श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.