IND vs SL 1st T20: सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव

India vs Sri Lanka 1st T20I : भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारताच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २१३ धावा केल्या.
IND vs SL 1st T20: सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव
India vs Sri Lanka 1st T20I
Published On

भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात श्रीलंका संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या संघाने २१३ धावा करत लंकसमोर २१४ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान करताना लंकेच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आले.

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेचा संघ १७० धावा करू शकला. भारतीय संघाने टी२० मालिकेतील पहिला सामना ४३ धावांनी जिंकलाय. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतलीय. भारताकडून रियान परागने सर्वाधिक ३ बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना कुसल मेंडिस आणि पथुम निसांका या सलामीच्या जोडीने श्रीलंकेच्या संघाला शानदार सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी ८४ धावांची भागीदारी केली, मात्र पहिली विकेट पडल्यानंतर भारतीय संघाने शानदार खेळी केली. या सामन्यात पुनरागमन करत श्रीलंकेचा डाव १९.२ षटकात १७० धावांवर नेला. मात्र श्रीलंकेचे सलामीवीर बाद होताच श्रीलंकेची फलंदाजी ढासळली. एक एक करून लंकेचे गडी बाद होत राहिले.

या सामन्यात भारतीय संघाने १७.१ षटकानंतर दमदार पुनरागमन केलं. हातातून निसटलेल्या या सामन्यात अक्षर पटेलने दोन विकेट घेत भारताला पुनरागमन करुन दिलं. डावातील १५ वे षटक टाकणाऱ्या अक्षरने पहिला सेट फलंदाज पथुम निसांकाला बाद केले. यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुसल परेराही झेलबाद झाला. परेरा २० धावा करून बाद झाला. तर निसांका ७९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताच्या गोलंदाजीत रियान परागने सर्वाधिक ३ बळी घेतले तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी २ बळी घेतले. या मालिकेत भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतलीय. या दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच २८ जुलै रोजी होणार आहे.

IND vs SL 1st T20: सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव
IND vs SL 1st T20: श्रीलंकेत सूर्यकुमारचा तुफानी खेळ; लंकेसमोर २१४ धावांचे आव्हान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com