USA vs BAN: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! बांगलादेशचा USA कडून दारुण पराभव

USA vs Bangladesh T20I Series: अमेरिकेने बांगलादेशला सलग दुसरा धक्का दिला आहे .मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशचा पराभव झाला आहे.
USA vs BAN: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! बांगलादेशचा USA कडून दारुण पराभव
usa vs bangladesh

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचा संघ अमेरिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत अमेरिकेने शानदार कामगिरी केली आहे. या संघाने बांगलादेशला सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत करत टी -२० मालिका २-० ने खिशात घातली आहे. या मालिकेतील तिसरा सामना शनिवारी खेळला जाणार आहे. दरम्यान या विजयासह अमेरिकेने बांगलादेशला तर धक्का दिलाच आहे. यासह भारतीय संघाला देखील नकळत चेतावणी दिली आहे.

भारतीय संघ ५ जून रोजी आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना आयर्लंडसोबत होणार आहे. भारतीय संघ ज्या गटात आहे. त्याच गटात अमेरिकेचा देखील समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघात एकापेक्षा एक धाकड खेळाडू आहेत. मात्र अमेरिकेलाही हलक्यात घेऊन चालणार नाही. अ गटात भारतीय संघासह पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका यांचा समावेश करण्यात आला आहे.

USA vs BAN: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! बांगलादेशचा USA कडून दारुण पराभव
SRH vs RR,Qualifier 2: कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? हैदराबादचे फलंदाज vs राजस्थानच्या गोलंदाजांमध्ये रंगणार लढत

बांगलादेशला होती १४५ धावांची गरज

या सामन्यात अमेरिकेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने २० षटकअखेर ६ गडी बाद १४४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला १९.३ षटकअखेर १३८ धावा करता आल्या. अमेरिकेकडून फलंदाजी करताना मोनांक पटेलने ३८ चेंडूंचा सामना करत ४२ धावांची खेळी केली. तर अॅरोन जॉन्सने ३४ चेंडूंचा सामना करत ३५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर अमेरिकेने २० षटकअखेर ६ गडी बाद १४४ धावा केल्या.

USA vs BAN: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! बांगलादेशचा USA कडून दारुण पराभव
SRH vs RR,Qualifier 2: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार क्वालिफायर २ चा थरार? एकाच क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १४५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. बांगलादेशकडून कर्णधार शान्तोने ३४ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ३६ धावा केल्या. तर शाकिब अल हसनने ३० धावांची खेळी केली. मात्र बांगलादेशचा संपूर्ण डाव १९.३ षटकात आटोपला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com