आयपीएल २०२४ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. स्पर्धेतील फायनलचा सामना २६ मे रोजी खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळण्यासाठी वेस्टइंडीजला रवाना होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मात्र या संघात स्थान दिलेल्या खेळाडूंपैकी प्रमुख खेळाडूंना आयपीएल २०२४ स्पर्धेत आपली छाप सोडता आलेली नाही.
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत डावाची सुरुवात करताना दिसून येणार आहे. मात्र या दोघांनीही आयपीएल २०२४ स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली आहे. या दोघांचा रेकॉर्ड पाहिला तर, रोहितने आयपीएल २०२४ स्पर्धेतील १३ सामन्यांमध्ये त्याने ३४९ धावा केल्या आहेत. तर १०५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. १३ सामन्यांमध्ये त्याला केवळ एकदाच ५० धावांचा आकडा पार करता आला आहे. तर यशस्वी जयस्वालने १३ सामन्यांमध्ये ३४८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १ अर्धशतक झळकावलं आहे.
सूर्यकुमार यादव हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याला सातत्य टिकवून ठेवता आलेलं नाही. असच काहीसं संजू सॅमसन आणि रिषभ पंत या दोघांच्या बाबतीत पाहायला मिळालं आहे. या दोघांपैकी एकाला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते.
आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या संघाचं नेतृत्व करताना नेतृत्वासह तो फलंदाजी आणि गोलंदाजीतही फ्लॉप ठरला आहे. तर दुसरीकडे डावखुरा हाताचा खेळाडू रविंद्र जडेजा देखील पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
भारतीय संघाला टी -२० वर्ल्डकप जिंकायचा असेल तर, गोलंदाजांनी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहसह अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांना स्थान देण्यात आलं आहे. मात्र दोघेही सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकात विकेट्स काढून देण्यात अपयशी ठरले आहेत.
त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संचाची मदार ही जसप्रीत बुमराह आणि फलंदाजीत विराट कोहलीवर असणार आहे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.