Team India Head Coach: BCCIने कुठल्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूला ऑफर दिलेली नाही; जय शहांचा मोठा खुलासा

Jay Shah On Team India Head Coach: भारतीय संघाचा मुख्यप्रशिक्षक कोण होणार याबाबत चर्चा सुरु असताना बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मोठा खुलासा केला आहे.
Team India Head Coach: BCCIने कुठल्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूला ऑफर दिलेली नाही; जय शहांचा मोठा खुलासा

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने नव्या मुख्यप्रशिक्षकाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. नवा मुख्य प्रशिक्षक कोण होणार? याबाबत अजून तरी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या पदासाठी दावेदार म्हणून रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर आणि स्टीफन फ्लेमिंगसारख्या दिग्गज मंडळींची नाव चर्चेत आहेत.

दरम्यान जय शाह यांनी आता याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की, बीसीसीआयने कुठल्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूला प्रशिक्षकाची ऑफर दिलेली नाही. या सर्व अफवा आहेत.

टी-२० वर्ल्डकपनंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला २०२७ पर्यंतच्या कालावधीसाठी भारतीय संघाला नवा मुख्यप्रशिक्षक हवा आहे. या पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, बीसीसीआयने जस्टीन लँगर यांना ऑफर दिली आहे. मात्र जय शहा यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

Team India Head Coach: BCCIने कुठल्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूला ऑफर दिलेली नाही; जय शहांचा मोठा खुलासा
SRH vs RR,Qualifier 2: कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? हैदराबादचे फलंदाज vs राजस्थानच्या गोलंदाजांमध्ये रंगणार लढत

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, जय शहा म्हणाले की, " जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलतो तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा मुख्यप्रशिक्षक होणं, याहून प्रतिष्ठित पद आणखी कुठलं असूच शकत नाही. भारतीय संघाचा चाहतावर्ग हा जगभर पसरलेला आहे. बीसीसीआय योग्य उमेदवाराची निवड करणार. बीसीसीआयने कुठल्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूला मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर दिलेली नाही.

Team India Head Coach: BCCIने कुठल्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूला ऑफर दिलेली नाही; जय शहांचा मोठा खुलासा
SRH vs RR,Qualifier 2: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार क्वालिफायर २ चा थरार? एकाच क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी वेस्टइंडिजल रवाना होणार आहे. १ जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com