Aus vs Afg : राशिद एकटा लढला, पण जिंकवू शकला नाही; ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानवर निसटता विजय

डिफेंडिंग चॅम्पियन ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकला असला तरी, राशिद खाननं सर्वांची मनं जिंकली.
T20 World Cup 2022, Aus vs Afg, Rashid Khan/ICC Twitter
T20 World Cup 2022, Aus vs Afg, Rashid Khan/ICC Twittersaam tv

Aus vs Afg, T20 World Cup 2022 : मैदानात फिल्डिंग, बॉलिंग या दोन्ही आघाड्यांवर जीव ओतून खेळणाऱ्या राशिद खानची एकाकी झुंज अपयशी ठरली अन् अवघ्या चार धावांनी अफगाणिस्तानला पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात विजय मिळवला असला, तरी राशिद खान यानं अखेरीला केलेल्या तुफानी फलंदाजीनं जगभरातील क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली.

टी २० वर्ल्डकपच्या ग्रुप १ मधून पहिला संघ सेमिफायनलमध्ये पोहोचलाय. न्यूझीलंडनं सेमिफायनलमध्ये स्थान जवळपास निश्चित केलं आहे. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करून सेमिफायनलमध्ये पोहोचण्याची संधी होती. त्यानुसार, प्रथम फलंदाजी करताना सुरुवातही तशीच झाली. (Cricket News)

त्यामुळे अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर उभारून ऑस्ट्रेलिया मोठा विजय मिळवेल असं वाटत असतानाच, डेथ ओव्हरमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी खोचक मारा केला आणि ऑस्ट्रेलियाच्या धुरंधरांना अवघ्या १६८ धावांवर रोखले. त्यासाठी ऑस्ट्रेलियाने आठ गडीही गमावले.

T20 World Cup 2022, Aus vs Afg, Rashid Khan/ICC Twitter
'हे' ४ योगायोग...हार्डकोर फॅन्सना ठाम विश्वास, T20 वर्ल्डकप टीम इंडियाच जिंकणार!

ऑस्ट्रेलियाकडून खेळताना मिचेल मार्श (४५ धावा) याने स्फोटक खेळी केली. तर दुसरीकडे मॅक्सवेल याने ३२ चेंडूंत ५४ धावा केल्या. त्यानं दोन षटकार आणि सहा चौकार खेचले.

१६९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या अफगाणिस्तानला घनीच्या रुपाने पहिलाच मोठा धक्का बसला. त्याने अवघ्या दोन धावा केल्या. दुसरीकडे सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाज याने फटकेबाजी सुरू ठेवली. त्याने १७ चेंडूंत ३० धावा कुटल्या. जादरान यानेही २६ धावा केल्या. गुलबदीन याने ३९ धावा केल्या. (T20 World Cup)

अफगाणिस्तान विजय मिळवेल असं वाटत असतानाच, झाम्पाच्या एकाच षटकात तीन विकेट गमावल्या आणि सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. पण हार मानेल तो राशिद कसला. तो मैदानात आला तोच वादळ बनून. त्याने आल्या आल्या फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने २३ चेंडूंत ४८ धावा कुटल्या. यात चार षटकार होते. तो अखेरपर्यंत लढला. झुंज दिली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर हा सामना ऑस्ट्रेलियाने फक्त ४ धावांनी जिंकला.

T20 World Cup 2022, Aus vs Afg, Rashid Khan/ICC Twitter
धोनीनं जगाला जे शिकवलं, त्याचेच परिणाम टीम इंडिया भोगतेय, माजी कर्णधार म्हणाला...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com