T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

ICC T20 rankings latest update 2026 : आयसीसीनं टी २० आंतरराष्ट्रीय रँकिंग जाहीर केलीय. टॉप ५ मध्ये भारतीय फलंदाजांचा जलवा बघायला मिळाला. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी कोणते खेळाडू आहेत, जाणून घ्या.
आयसीसीच्या ताज्या टी २० रँकिंगमध्ये ईशान किशन पहिल्या आणि अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी आहेत. श्रेयस अय्यरने सात स्थानांची झेप घेतली.
आयसीसीने टी २० रँकिंग जाहीर केली असून, अव्वल १० मध्ये भारताचे तीन फलंदाज आहेत. saam tv
Published On

latest ICC T20 international player rankings : आयसीसीनं आज, बुधवारी पुरूष टी २० आणि वनडे खेळाडूंची रँकिंग जाहीर केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरनं टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतलीय. त्याला सात स्थानांचा फायदा झाला असून, थेट २२ व्या क्रमांकावर पोहोचलाय. त्याचे ६२७ रेटिंग पॉइंट्स आहेत.

अय्यरनं मंगळवारी जपानविरुद्धच्या ऐतिहासिक टी २० सामन्यात १६ धावा केल्या होत्या. तो पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला. भारत आणि जपान यांच्यातील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता. अय्यरनं मागील आठवड्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात २९ धावांचं योगदान दिलं होतं. विकेटकीपर ईशान किशन (९०४) अव्वल स्थानी कायम आहे. पण त्याला ९ रेटिंग पॉइंट्सचे नुकसान सोसावं लागलं. त्यानं जपानविरुद्धच्या सामन्यात फक्त ३ धावा केल्या होत्या. गोल्डन डकचा शिकार ठरलेला अभिषेक शर्मा (८९३) दुसऱ्या स्थानी कायम आहे.

इंग्लंडच्या कर्णधाराची टॉप ५ मध्ये एन्ट्री

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकला वनडे आणि टी २० फलंदाजी रँकिंगमध्ये जबरदस्त फायदा झालाय. इंग्लंडनं नुकतंच श्रीलंकेचा ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत सुपडासाफ केला. पहिला वनडे सामना ८९ धावांनी जिंकला. ब्रूक २३७ धावा करून 'प्लेअर ऑफ द सीरीज' ठरला. त्यानं टी २० रँकिंगमध्ये पाच स्थानांनी झेप घेत चौथ्या स्थानी पोहोचलाय. ब्रूकचे ७९३ रेटिंग आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वोच्च रेटिंग आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडेत ६७ धावांची खेळी करणारा ब्रूक वनडे फलंदाजी रँकिंगमध्ये १२ व्या स्थानी पोहोचलाय. इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलर टी २० मध्ये पाचव्या स्थानी आहे.

आयसीसीच्या ताज्या टी २० रँकिंगमध्ये ईशान किशन पहिल्या आणि अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी आहेत. श्रेयस अय्यरने सात स्थानांची झेप घेतली.
CSK head coach : धोनीच्या चेन्नईचा हेड कोच बदलला, महाराष्ट्रातील स्टारकडे जबाबदारी

ओव्हरटन सु्साट

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटन टी २० मालिकेतील कामगिरीमुळं रँकिंगमध्ये चमकलाय. ४७ स्थानांची अविश्वसनीय झेप घेऊन ते गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल १० मध्ये आलाय. सध्या तो सहाव्या स्थानी आहे. त्याची कारकिर्दीतील ६७४ ही सर्वोत्कृष्ट रेटिंग आहे. इंग्लंडच्या विल जॅक्सने पहिल्या वनडे सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. तो ३५ स्थानांनी झेपावून ३७ व्या क्रमांकावर पोहोचलाय.

वनडे ऑलराउंडर रँकिंगमध्येही तो तिसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालगेने ४५ धावा केल्या आणि एक विकेट घेतली. तो ऑलराउंडर रँकिंगमध्ये २२ व्या स्थानी आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार आणि ऑलराउंडर सिकंदर रझा हा देखील रँकिंगमध्ये चमकतोय. अफगाणिस्तानच्या अजमतुल्लाह उमरजईशी त्याची स्पर्धा वाढलीय. रझाच्या खात्यात २७६ गुण आहेत. तर उमरजई ३३७ गुणांसह पहिल्या स्थानी आहे.

टी २० रँकिंगमध्ये टॉप १० फलंदाज

  1. ईशान किशन

  2. अभिषेक शर्मा

  3. साहिबजादा फरहान

  4. हॅरी ब्रूक

  5. जोस बटलर

  6. ब्रेव्हिस

  7. फिल सॉल्ट

  8. पथुम निसांका

  9. तिलक वर्मा

  10. मिचेल मार्श

आयसीसीच्या ताज्या टी २० रँकिंगमध्ये ईशान किशन पहिल्या आणि अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी आहेत. श्रेयस अय्यरने सात स्थानांची झेप घेतली.
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघानं घडवला इतिहास; श्रीलंकेचा धुव्वा उडवत सुवर्णपदक जिंकलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com