आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघानं घडवला इतिहास; श्रीलंकेचा धुव्वा उडवत सुवर्णपदक जिंकलं

Indian Women Team Create History at Asian Games : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवलाय. अंतिम सामन्यात टीम इंडियानं १४७ धावांनी विजय मिळवला.
Indian Women Team  Create History at Asian Games
India Women won the Asian Games 2026 cricket gold medal after defeating Sri Lanka by 147 runs.saam tv
Published On
Summary
  • स्मृती मानधनाची ७९ धावांची शानदार खेळी

  • शफाली वर्माची ४८ धावांची आक्रमक खेळी

  • आशियाई क्रीडा महिला क्रिकेट अंतिम सामन्यात भारताचा दणदणीत विजय

महिला क्रिकेट संघाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकलंय. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा १४७ धावांच्या फरकाने पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करताना शफाली वर्मा (४८), स्मृती मानधना (७९) आणि रिचा घोष (४९) यांच्या शानदार खेळींच्या जोरावर भारताने २१६ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त मारा करत संपूर्ण श्रीलंकन ​​संघाला अवघ्या ६९ धावांत गुंडाळलं.

२१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचे कर्णधार चमारी अट्टापट्टू आणि इमेशा दुलानी यांनी डावाला सुरुवात केली.त्यांना पहिल्या विकेटसाठी केवळ १८ धावांची भर घालता आली. दुसरीकडे फलंदाजीमध्ये चमक दाखवल्यानंतर शफाली वर्माने गोलंदाजीमध्येही धुमाकूळ घातला आणि पॉवरप्लेमध्ये दोन बळी टिपले. तिने दुलानी (३) आणि हसिनी परेरा (०) यांना बाद केले.पॉवरप्ले संपल्यानंतरच्या लगेचच्या षटकात, दीप्ती शर्माने चमारी अथापथ्थूला झेलबाद करून श्रीलंकेला मोठा धक्का दिला.

Indian Women Team  Create History at Asian Games
Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

अथापथ्थूने २१ चेंडूंत पाच चौकारांसह २१ धावा केल्या. त्यानंतरच्या षटकात श्रेयंका पाटीलने हर्षिता माधवीला शुन्य धावांवर बाद केले. ४९ धावांच्या धावसंख्येवर हन्सिमा करुणारत्ने (१) बाद झाल्यामुळे श्रीलंकेची पाचवी विकेट पडली. त्याच ४९ धावांच्या धावसंख्येवर श्रीलंकेची सहावी विकेटही गेली. दीप्ती शर्माने कविशा दिलहारीला (११) बाद केले.

सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले

संपूर्ण श्रीलंकन ​​संघ ६९ धावांत बाद झाला. भारतासाठी दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना १४७ धावांनी जिंकून भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला संघाचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे.

Indian Women Team  Create History at Asian Games
Ajit Agarkar: अजीत आगरकर यांचा कार्यकाळ संपणार? BCCI च्या निर्णयाआधी दोन दिग्गजांची नावं चर्चेत, कोण होणार नवा चीफ सिलेक्टर?

स्मृती मानधना यांची ऐतिहासिक खेळी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भारतीय संघाने शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना या सलामीच्या जोडीच्या जोरावर शानदार सुरुवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. शेफाली अवघ्या दोन धावांनी अर्धशतक हुकली, तिने २९ चेंडूंमध्ये तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com